कपिल शर्मा व गिन्नी चतरथचे ब्रेकअप! किती खरे, किती खोटे!! वाचा, आणखी एक धक्कादायक बातमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 09:02 AM2017-09-15T09:02:05+5:302017-09-15T14:32:05+5:30
कपिल शर्मा आणि त्याची गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथ या दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी कालच चर्चेत होती. पण कदाचित मनोरंजनाच्या दुनियेत ...
क िल शर्मा आणि त्याची गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथ या दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी कालच चर्चेत होती. पण कदाचित मनोरंजनाच्या दुनियेत ‘कॉनस्टंट’ काहीच नाही. म्हणून तर चर्चा होतात आणि नंतर त्या अफवा ठरतात. अर्थात काही चर्चा ख-याही ठरतात. पण त्याचे प्रमाण कमीच.
काल कपिलच्या ब्रेकअपची बातमी आली आणि आज दुस-याच दिवशी ही चर्चा ‘अफवा’ ठरली. होय,कपिलच्या एका जवळच्या मित्राने कपिलच्या ब्रेकअपची चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. कपिलचा हा जवळचा मित्र म्हणजे, दिनेश कुमार. गिन्नी व कपिलच्या ब्रेकअपची बातमी शुद्ध बकवास असल्याचे त्याचे म्हणणे आहे. ‘असे काहीही नाही. कपिल आणि गिन्नी सोबत आहे आणि त्यांचे रिलेशन एकदम पक्के आहे. मी कॉलेजच्या दिवसांपासून कपिला ओळखतो. ब्रेकअप झाले असते तर ते मला नक्की ठाऊक असते. कारण कपिल केवळ माझा मित्र नाही तर माझा भाऊ आहे आणि त्याच्या खासगी आयुष्यात गोष्टी माझ्यापासून लपून राहत नाहीत. कपिलचा चित्रपट रिलीजच्या वाटेवर आहे. कदाचित याचमुळे काही लोक त्यांच्याबद्दल अशा नकारात्मक आणि खोट्या अफवा पसरवताहेत. मी केवळ इतकेच म्हणेल की, गिन्नी व कपिल यांच्यांत कुठलेही ब्रेकअप झालेले नाही,’ असे दिनेश म्हणाला.
ALSO READ : कपिल शर्मासंदर्भात आणखी एक धक्कादायक बातमी! गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत झाले ब्रेकअप!!
आता खरे काय ते आम्हाला ठाऊक नाही. कारण कपिल वा गिन्नी या दोघांपैकी कुणी एक बोलत नाही तोपर्यंत हा संभ्रम मिटणारा नाही. काही लोकांचे मानाल तर कपिल व गिन्नीच्या ब्रेकअपची बातमी निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे. होय, कपिलच्या ‘फिरंगी’ या आगामी चित्रपटापूर्वी जाणीवपूर्वक निर्माण केला गेलेला. ‘फिरंगी’चे मेकर्स कपिलची ‘सिंगल मॅन’ ही इमेज प्रमोट करू इच्छितात आणि केवळ यासाठी हा सगळा खटाटोप चालल्याचे कळतेय. आता या खटाटोपात कपिलच्या वाट्याला किती यश येते, ते बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.
काल सूत्रांनी कपिल व गिन्नीच्या ब्रेकअपची बातमी दिली होती. कपिलच्या टीममधील एक महिला सदस्य या ब्रेकअपला कारणीभूत असल्याचेही म्हटले गेले होते. अर्थात या महिला सदस्याचे नाव या सूत्राने सांगितले नव्हते. पण ती कपिलची एक्स गर्लफ्रेन्ड आणि एक्स क्रू मेंबर प्रिती सिमोन्स असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता.