टीव्ही शो नाही तर ‘हा’ चित्रपट घेऊन येतोय कपिल शर्मा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 02:57 PM2018-08-19T14:57:21+5:302018-08-19T14:58:29+5:30

मीडियासोबतचे वाद, मग डिप्रेशन, मग काय मद्याचे व्यसन अशा वाईट कारणांसाठीच कपिल शर्मा चर्चेत राहिला. पण आता कपिल पुन्हा एकदा नव्या दमाने वापसी करतोय. 

kapil sharma becomes producer with film son of manjeet singh | टीव्ही शो नाही तर ‘हा’ चित्रपट घेऊन येतोय कपिल शर्मा!!

टीव्ही शो नाही तर ‘हा’ चित्रपट घेऊन येतोय कपिल शर्मा!!

googlenewsNext

छोट्या पडद्यावरचा कॉमेडी किंग कपिल शर्मा दीर्घकाळापासून पडद्यावर दिसलेला नाही. सुनील ग्रोव्हरसोबत भांडण काय झाले आणि या भांडणानंतर कपिलच्या करिअरला ओहोटी लागली. मीडियासोबतचे वाद, मग डिप्रेशन, मग काय मद्याचे व्यसन अशा वाईट कारणांसाठीच तो चर्चेत राहिला. पण आता कपिल पुन्हा एकदा नव्या दमाने वापसी करतोय. अर्थात टीव्ही शो नाही तर कपिल पुन्हा एकदा एक चित्रपट घेऊन येतो आहे. 



 

होय, अ‍ॅक्टिंगनंतर कपिल एका पंजाबी चित्रपटाद्वारे निर्मित क्षेत्रात पाऊल ठेवतोय. ‘सन आॅफ मंजीत सिंह’ हा पंजाबी चित्रपट तो प्रोड्यूस करतोय. स्वत: कपिलने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली. त्याने या चित्रपटात फर्स्ट लुक व्हिडिओही शेअर केला. विक्रम ग्रोव्हर दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १२ आॅक्टोबरला रिलीज होतोय. कपिल आपल्या या चित्रपटाबद्दल बराच उत्सूक दिसतोय. आता हा पंजाबी चित्रपट कपिलला किती यश मिळवून देतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
गेल्या काही महिन्यांत कपिलचे वजन प्रचंड वाढलेय. इतके की त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. हे वजन कमी करून पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या लूकमध्ये परतण्यास कपिल प्रयत्न करतोय. येत्या आॅक्टोबरपर्यंत पुन्हा एकदा टीव्हीवर दमदार वापसी करण्याचीही कपिलची योजना आहे. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, कपिल शमार्ला पुन्हा एकदा आपल्या आयुष्याची गाडी रूळांवर आणायची आहे. त्यामुळे त्याने आपल्या जीवनशैलीत अनेक बदल केले आहेत. आधीसारखा फिट होण्यासाठी तो प्रयत्न करतोय. यासाठी त्याने एक पर्सनल ट्रेनर हायर केला आहे.

Web Title: kapil sharma becomes producer with film son of manjeet singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.