भूमी आणि कपिल शर्मा कर्नाटकच्या मदतीसाठी आले एकत्र, कोरोना काळात अशी करतायेत मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 06:13 PM2021-05-27T18:13:45+5:302021-05-27T18:18:26+5:30
ग्रामीण भारतातही या साथीचा मोठा तडाखा बसला. लहान शहरे आणि गावांमधून विषाणू प्रादुर्भाव वाढल्याचे दिसते. या ठिकाणी पुरेशा वैद्यकीय सुविधा नाहीत, किंवा त्या मर्यादित आहेत. रुग्णांना प्राणवायू उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने कोविड-19 च्या दुसऱ्या महासाथीत आपल्या देशबांधवांकरिता अविरत मदतीचा हात पुढे केला आहे. आता तिने कर्नाटकमधील कोविड-19 विषाणूग्रस्त रुग्णांना मदत करण्याच्या दृष्टीने कपिल शर्मा सोबत हातमिळवणी केली आहे. भूमीने ‘श्री श्री रवी शंकर यांच्या मिशन जिंदगी’ उपक्रमात सहभाग घेतला आहे. या उपक्रमाद्वारे कपिलसोबत भूमी कर्नाटक राज्यातील गरजवंतांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येतो. या उपक्रमातंर्गत होसकोटे, देवानहळ्ळी, दोडाबल्लापूर, नेलमंगला-1 आणि नेलमंगला-2 मधील रूग्णालयांत असणाऱ्या गरजूंसाठी ऑक्सिजन बस नेण्यात येतील.
भूमी म्हणते, “सध्या आपल्या देशात विषाणूची दुसरी लाट जीवघेणी ठरते आहे. ग्रामीण भारतातही या साथीचा मोठा तडाखा बसला. लहान शहरे आणि गावांमधून विषाणू प्रादुर्भाव वाढल्याचे दिसते. या ठिकाणी पुरेशा वैद्यकीय सुविधा नाहीत, किंवा त्या मर्यादित आहेत. रुग्णांना प्राणवायू उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. मिशन जिंदगी’च्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भारतावर लक्ष केंद्रित केले आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांपासून मदतीची सुरुवात करत आहोत.”
तिने पुढे सांगितले, “आमच्या बसमध्ये ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर बसविण्यात आले आहेत. ज्या रुग्णांना बेडची प्रतीक्षा आहे व ज्यांना आपतकालीन स्थितीत जिल्ह्याबाहेर जावे लागते. त्यांच्याकरिता ही सुविधा करण्यात आली आहे. छोट्या शहरांमध्ये केसचे प्रमाण वाढल्याने रुग्णालयांवर येणारा ताण या बस सुविधेमुळे कमी होईल. या अभियानाकरिता कपिलसोबत एकत्र काम करण्याची संधी माझ्यासाठी आनंददायी आहे. अनेक गंभीरपणे कोविड-19 ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना मदत मिळते आहे. या सध्याच्या कठीण काळात गुरुदेव आशेचे किरण बनले आहेत. मी त्यांचे आभार मानते.”
कपिल शर्मा म्हणाला की, “माणूस म्हणून सध्याच्या काळात आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. मी माझे योगदान देतो आहे. गुरुदेव आणि बीजेएस (भारतीय जन संघटना)चे अद्वितीय कार्य सुरू आहे, त्यांच्यासमवेत काम करण्याची मिळालेली संधी माझ्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे. भूमी कोविड मदत कार्यात अप्रतिम काम करते आहे. या उपक्रमामार्फत मोबाईल ऑक्सिजन बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अधिक राज्यांमध्ये या बस पोहचविण्याची योजना आहे.”