कपिल शर्मा करतोय चित्रपटाची निर्मिती!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2017 08:08 AM2017-01-22T08:08:29+5:302017-01-22T13:38:29+5:30
‘ द कपिल शर्मा शो’च्या यशस्वितेनंतर कॉमेडियन कपिल शर्मा हा ‘फिरंगी’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. ट्विट करुन त्याने ...
‘ द कपिल शर्मा शो’च्या यशस्वितेनंतर कॉमेडियन कपिल शर्मा हा ‘फिरंगी’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. ट्विट करुन त्याने ही गोड बातमी दिलीय. त्यासोबतच आणखी दोन कॉमेडी शो चीदेखील निर्मिती करणार असल्याचे त्याने म्हटंलय.
आपल्या शोवर त्याने बºयाचवेळा चित्रपट करणार असल्याचे सांगितले होते, मात्र चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे त्याने पहिल्यांदाच सांगितलंय. शनिवारी ट्विटरवर त्याने ही गोष्ट जाहीर केली. या चित्रपटात तो हिरोबरोबरच निर्मातादेखील असणार आहे. थोडक्यात हा डबल धमाका असणार आहे.
या चित्रपटाच्या निर्मितीसाठी कपिल परिश्रम घेतो आहे. या संदर्भात त्याने सामाजिक माध्यमांतून आपले फोटोही शेअर केले आहेत. यात तो व्यायाम करताना दिसतो. त्याचप्रमाणे त्याने आपले वजनही कमी केले आहे. शनिवारी याबाबत त्याने ट्विट करताना म्हटले की, ‘लवकरच निर्माता म्हणून माझा ‘फिरंगी’ चित्रपट येतो आहे. आपल्या आशीर्वादाची मला गरज आहे.
{{{{twitter_post_id####
या चित्रपटात कपिल कोणती भूमिका करणार आहे किंवा त्याच्यासोबत अजून कोण असतील, याची माहिती त्याने दिलेली नाही. कपिलने यापूर्वीही चित्रपटात काम केले आहे. अब्बास मस्तानच्या ‘किस किस को प्यार करूं’ या चित्रपटात त्याने हिरो म्हणून काम केलेले आहे.
या चित्रपटासोबतच तो आणखी दोन नवीन कॉमेडी शो करतो आहे, याचीही माहिती त्याने ट्विटरवर दिली आहे. ‘वर्षाची पहिली बातमी. के ९ दोन नवीन कॉमेडी शो घेऊन येत आहे. आपल्यालाही ते आवडतील. आनंदी रहा.’ कपिलने यापूर्वी अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ३, झलक दिखला जा-६, कॉमेडी सर्कसमध्ये काम केले होते. त्यानंतर स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस सुरू करुन त्याने ‘कॉमेडी नाईट विथ द कपिल’ची निर्मिती केली. सध्या तो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये काम करतो आहे.

}}}}My first Bollywood movie as a producer .."FIRANGI" .. coming soon.. need ur blessings :)— KAPIL (@KapilSharmaK9) January 21, 2017