डाकुओं के सरदार लग रहे हो! कपिल शर्माचा फ्रेंच दाढीसह नवा लुक; नेटकऱ्यांनी घेतली मजा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 03:45 PM2023-10-03T15:45:38+5:302023-10-03T15:46:36+5:30

लोकप्रिय अभिनेता कपिल शर्मा फ्रेंच दाढीसह नवा लुक केलाय.

Kapil Sharma's New Look With French Beard | डाकुओं के सरदार लग रहे हो! कपिल शर्माचा फ्रेंच दाढीसह नवा लुक; नेटकऱ्यांनी घेतली मजा

Kapil Sharma

googlenewsNext

लोकांना पोट धरुन हसवणारा सर्वांचा आवडता आणि लोकप्रिय अभिनेता कपिल शर्मा. तो कायमच चर्चेत असतो. नुकतंच त्यानं एक व्हिडीओ शेअर केला असून याचीच चर्चा जोरदार रंगल्याचं दिसतंय. तर व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, काहीतरी नवीन येत आहे, काहीतरी नवीन करण्यासाठी हा बदल. मात्र, हे नवीन काय घडणार आहे, याबाबत कपिलने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही.

 कपिल शर्माने आपला लूक बदलला आहे. याचा एक व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याची दाढी फ्रेंच कट करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कपिल त्याच्या स्टायलिस्टला विचारतो की, "मी कोणत्या देशाचा दिसतोय? तर त्याचा स्टायलिस्ट म्हणतो की तू इटालियन दिसतोय. कपिलने विचारले तू कधी इटलीला गेला आहेस का, तर स्टायलिस्ट म्हणतो, नाही पण मी हाऊसफुल पाहिला आहे, अशी दाढी त्यात दिसली होती. कपिल गमतीने चाहत्यांना विचारतो - मी इटालियन दिसतो का?". तर यावर चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. 

एकाने लिहलं की, 'अरे कप्पू, नवीन लूकमध्ये तू खूप छान दिसत आहेस'. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, 'डाकुओं के सरदार लग रहे हो'. तर काही चाहत्यांनी कपिलला कमेंट सेक्शनमध्ये  पुढचा प्रोजेक्ट कोणता आहे, असे विचारले. 

कपिल शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 2015 मध्ये 'किस-किस को प्यार करूं' मधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. कपिल शर्माने  'फिरंगी'मध्ये काम केले होते. मात्र, तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. पण कपिलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ज्विगाटो'ला भरभरून दाद मिळाली होती. तर कपिल शर्मा  'द क्रू' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एकता कपूर आणि रिया कपूर यांची निर्मिती करत आहेत.

Web Title: Kapil Sharma's New Look With French Beard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.