आर. के. स्टुडिओमध्ये साजरा होतोय शेवटचा गणेशोत्सव, भावूक झाले रणधीर कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 09:37 PM2018-09-14T21:37:21+5:302018-09-14T21:38:30+5:30

आर. के. स्टुडिओमध्ये गेल्या ७० वर्षांत नित्यनेमाने गणेशोत्सव साजरा होत आहे.  यावर्षीही हा साजरा होत आहे. पण यावर्षीचा, गणेशोत्सव हा आर. के. स्टुडिओमधील शेवटचा गणेशोत्सव असणार आहे.

Kapoor family to host last Ganesh Chaturthi celebration at RK Studios | आर. के. स्टुडिओमध्ये साजरा होतोय शेवटचा गणेशोत्सव, भावूक झाले रणधीर कपूर!

आर. के. स्टुडिओमध्ये साजरा होतोय शेवटचा गणेशोत्सव, भावूक झाले रणधीर कपूर!

googlenewsNext

कपूर घराण्याचा ठेवा असलेला ऐतिहासिक आर. के. स्टुडिओ लवकरच विकल्या जाणार आहे. राज कपूर यांनी ७० वर्षांपूर्वी या स्टुडिओची स्थापना केली होती. मात्र, लवकरच हा स्टुडिओ इतिहासजमा होणार आहे. या आर. के. स्टुडिओमध्ये गेल्या ७० वर्षांत नित्यनेमाने गणेशोत्सव साजरा होत आहे.  यावर्षीही हा साजरा होत आहे. पण यावर्षीचा, गणेशोत्सव हा आर. के. स्टुडिओमधील शेवटचा गणेशोत्सव असणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीचीही आर. के. स्टुडिओतील गणेश स्थापनेला संपूर्ण कपूर परिवार एकत्र आलेला दिसला. पण यंदा यावेळी हा गणेशोत्सव कपूर कुटुंबीयांना भावूक करणारा ठरला. विशेषत: रणधीर कपूर प्रचंड भावूक झालेले दिसले. आर. के. स्टुडिओचा शेवटचा गणेशोत्सव असल्याने रणधीर कपूर यांना याक्षणी भावना रोखणे अशक्य झाले.

 स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न तुलनेने कमी असून त्याच्या देखभालीसाठी होणारा खर्चच जास्त असल्यामुळे  कपूर भावंडांनी या स्टुडिओला विकण्याचा  निर्णय घेण्यात आल्याचे कळते. ऋषी कपूर यांनी या बातमीला दुजोरा दिला होता. आर.के. स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर स्टुडिओचे आणि त्यात संग्रहीत केलेल्या स्मृतींचेही अतोनात नुकसान झाले. आता तो पुन्हा उभा करणे शक्य नाही. आता हा स्टुडिओ विकणं योग्य ठरेल असा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले होते. 

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात या स्टुडिओच्या स्टेज नंबर १ वर  ‘सुपर डान्सर’या डान्स रिअ‍ॅलिटी शोचा सेट उभारण्यात आला होता. या सेटवर शॉर्ट सर्किटमुळे  आग लागली होती. आधी सेटवरच्या पडद्यांनी पेट घेतला आणि मग संपूर्ण स्टेज जळून खाक झाला होता. काहीच क्षणात स्टुडिओच्या अन्य भागात ही आग पसरली होती. या आगीने अनेक जुन्या आठवणी क्षणात नष्ट झाल्यात. ऋषी कपूर यांनी याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले होते. अजूनही विश्वास बसत नाहीये, असे ते म्हणाले होते.

Web Title: Kapoor family to host last Ganesh Chaturthi celebration at RK Studios

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.