इतकी बदलली ‘करण-अर्जुन’ची ‘आई’! ओळखणेही झाले कठीण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 06:36 AM2018-01-10T06:36:00+5:302018-01-10T12:06:00+5:30
बॉलिवूडच्या इतिहासात असे अनेक चेहरे आहेत, जे त्यांच्या खºया नावाने कमी आणि पडद्यावरच्या नावाने अधिक ओळखले जातात. असाच एक ...
ब लिवूडच्या इतिहासात असे अनेक चेहरे आहेत, जे त्यांच्या खºया नावाने कमी आणि पडद्यावरच्या नावाने अधिक ओळखले जातात. असाच एक चेहरा म्हणजे, अभिनेत्री राखी मजूमदार. १९९५ मध्ये आलेल्या ‘करण अर्जुन’ या चित्रपटात शाहरूख खान आणि सलमान खानच्या आईची भूमिका साकारणा-या राखीचा एक संवाद आजही लोकांच्या स्मरणात आहे. हा संवाद म्हणजे, ‘मेरे करण अर्जुन आऐंगे’. शाहरूख व सलमानच्या आईची भूमिका साकारणारी हीच राखी इतक्या वर्षात पुरती बदललीयं. इतकी की, तिला पाहिल्यानंतर तुम्ही कदाचित ओळखूही शकणार नाहीत. राखी आधीपेक्षा बरीच मॉर्डन झालेली यात दिसत आहे. अलीकडे राखी सलमानचे पिता सलीम खान आणि आई हेलनसोबत दिसली. यावेळी ती अतिशय वेगळ्या लूकमध्ये दिसून आली. अगदी आखूड केस, डोळ्यांवर चष्मा असा तिचा लूक होता.
‘करण अर्जुन’ हा चित्रपट राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धम्माल केली होती. यातील राखीच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. राखीचा जन्म १५ आॅगस्ट १९४७ रोजी झाला होता. आपल्या करिअरमध्ये तिने किमान २०० पेक्षा अधिक चित्रपट केलेत. वयाच्या २० व्या वर्षी एका बांगला चित्रपटातून राखीने अभिनयास सुरवात केली. यानंतर तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. ‘जीवन मृत्यू’ हा तिचा पहिला चित्रपट. २००९ मध्ये राखी ‘क्लायमेट्स’मध्ये दिसली. यानंतर तिने कुठलाही चित्रपट साईन केला नाही.
सत्तरीच्या दशकात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणा-या राखीचे लग्न अजय बिस्वास या निर्मात्यासोबत झाले होते. अजय यांच्यामुळेच ती अभिनयक्षेत्रात आली. पण लग्नाच्या काहीच वर्षांनंतर त्यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर दिग्दर्शक, गीतकार व कवी गुलजार तिच्या आयुष्यात आले आणि त्यांच्यासोबत तिने लग्न केले. पण राखीने चित्रपटात काम करू नये असे गुलजार यांचे म्हणणे होते. त्यामुळे गुलजार यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर राखीने चित्रपटांत काम करणे बंद केले. राखीला लग्नानंतरही अनेक चित्रपटांच्या आॅफर्स येत होत्या. पण चित्रपटात काम करण्याचा विषय काढताच गुलजार तिच्यावर चिडत असत आणि त्यामुळे तिने चित्रपटसृष्टीपासून दूर राहाण्याचेच ठरवले. या कारणामुळे सतत त्यांच्यात खटके उडत असत. ‘आंधी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी तर त्यांच्यात खूप मोठी भांडणे झाली असे म्हटले जाते.