exclusive! करण जेव्हा वडिलांना म्हणाला मला अभिनेता व्हायचंय, त्यावेळी सनी देओलने दिली होती ही रिअॅक्शन
By गीतांजली | Updated: September 12, 2019 19:00 IST2019-09-12T19:00:00+5:302019-09-12T19:00:00+5:30
सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून करण बॉलिवूड डेब्यू करतोय.

exclusive! करण जेव्हा वडिलांना म्हणाला मला अभिनेता व्हायचंय, त्यावेळी सनी देओलने दिली होती ही रिअॅक्शन
बॉलिवूडच्या देओल कुटुंबाने इंडस्ट्रीला धर्मेन्द्र देओल, सनी देओल, बॉबी देओल, अभय देओल असे दिग्गज स्टार्स दिलेत. या सगळ्यांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता या कुटुंबातून आणखी एक नवा चेहरा इंडस्ट्रीत येतोय. तो म्हणजे, सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून करण बॉलिवूड डेब्यू करतोय. विशेष म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शन त्याचे वडील सनी देओल करतायेत.
या सिनेमाच्या निमित्ताने ज्यावेळी करण देओलने लोकमतशी संवाद साधला त्यावेळी त्यावेळी त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. करणला विचारण्यात आले तुला अभिनेता व्हायचे आहे ही गोष्ट तू सर्वात आधी घरी कुणाला सांगितलीस यावर करण म्हणाला आईला. त्यानंतर मी बाबांशी (सनी देओल) बोललो. बाबा म्हणाले तुला नक्की अभिनेता व्हायचे आहे. कारण या क्षेत्रात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. इथं तुम्हाला सारखी संधी मिळत नाहीत. आलेल्या संधीचं सोनं करावे लागते. तुला कामाशी नेहमी प्रामाणिक राहता यावं लागलं.
'पल पल दिल के पास'मधून तो बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. यात त्याच्यासोबत साहिर बंबासुद्धा दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन दुसरे तिसरे कुणी करत नसून स्वत: सनी देओल करतोय. पल पल दिल के पास हा चित्रपट 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.