या चिमुकल्याला साकारायचीय रुपेरी पडद्यावर सनी देओलची भूमिका, नाव वाचून तुम्ही पडला चाट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 03:42 PM2019-08-31T15:42:44+5:302019-08-31T15:51:37+5:30
अभिनेता सनी देओलने दामिनी, गदर, डर, बॉर्डर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.
अभिनेता सनी देओलने दामिनी, गदर, डर, बॉर्डर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनयानंतर सनी राजकारणात देखील उतरला आहे. गुरुदासपूरमधून सनी निवडून आला आहे. मात्र सध्या तो पल पल दिल के पास या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिजी आहे. या चित्रपटाचे तो दिग्दर्शन करत असून या चित्रपटाद्वारे त्याचा मुलगा करणला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. करण देओल 'पल पल दिल के पास' सिनेमात तो एका हिमाचलमधील मुलाची भूमिका साकारतोय. या भूमिकेची तयारी करण्यासाठी जवळपास 3 ते 4 महिने तो हिमाचलमध्ये अॅडव्हॅंचर स्पोर्ट्सची ट्रेनिंग घेतली.
या सिनेमाच्या निमिताने लोकमतशी बोलताना करणला विचारण्यात आले तुला भविष्यात कोणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडले यावर करणने क्षणाचा ही विलंब न लावता पापा असे नाव घेतलं.
याचा अर्थ करण देओललासनी देओलच्या बायोपिकमध्ये काम करायचं आहे. तसेच करणला इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण करायची आहे. त्याला वडिलांच्या शेड्मधून बाहेर यायचे आहे. फक्त सनी देओलचा मुलगा इथपर्यंत ओळख मर्यादित ठेवायाची नाही.
करण देओलचा आगामी सिनेमा 'पल पल दिल के पास'च्या टीझरला बॉलिवूडकरांची पसंती आधीच मिळाली आहे. सलमान खान, शाहरुख खान यांनी टीझर पाहून करणला शुभेच्छा दिल्या आहेत. पल पल दिल के पास हा चित्रपट 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.