पहिल्याच दिवशी सेटवर निराश झाला होता सनी देओलचा मुलगा करण देओल, मग या व्यक्तिने दिला आधार
By गीतांजली | Published: August 30, 2019 11:42 AM2019-08-30T11:42:29+5:302019-08-30T11:57:02+5:30
बॉलिवूडच्या देओल कुटुंबाने इंडस्ट्रीला धर्मेन्द्र देओल, सनी देओल, बॉबी देओल, अभय देओल असे दिग्गज स्टार्स दिलेत. या सगळ्यांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
बॉलिवूडच्या देओल कुटुंबाने इंडस्ट्रीला धर्मेन्द्र देओल, सनी देओल, बॉबी देओल, अभय देओल असे दिग्गज स्टार्स दिलेत. या सगळ्यांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता या कुटुंबातून आणखी एक नवा चेहरा इंडस्ट्रीत येतोय. तो म्हणजे, सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून करण बॉलिवूड डेब्यू करतोय. विशेष म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शन त्याचे वडील सनी देओल करतायेत. यासिनेमाच्या निमित्ताने करणशी साधलेला हा खास संवाद..
सेटवर पहिल्या दिवशी कॅमेरा फेस करताना तू किती नव्हर्स होतास, कारण या सिनेमाचे दिग्दर्शन तुझे वडील करतायेत ?
पहिलाच शॉट माझ्यासाठी खूप कठीण होता. मला एक ट्रक चालवायचा होता आणि मनालीचे रस्ते फारसे काही चांगले नाहीत. त्यामुळे तो चालवताना मला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यानंतर मी खूप निराश झालो. मग मला क्रूमधल्या एक व्यक्तिने समजावले असा निराश होऊ नकोस आज तुझा पहिलादिवस आहे असे होते. त्याच्या बोलण्यानंतर मी थोडा धीर आला आणि माझा नव्हर्सनेस निघून गेला.
तुझ्यावर सनी देओलाचा मुलगा असल्यामुळे प्रेक्षकांच्या खूप जास्त अपेक्षा असतील, या गोष्टीचे तुझावर दडपण आहे का ?
सनी देओलाचा मुलगा आहे त्यामुळे माझ्या सिनेमातही अॅक्शन असणारच असे सगळ्यांना वाटतंय. सिनेमा अॅक्शन आहे पण त्याचसोबत रोमान्ससुद्धा आहे. पण मला माझ्या वडिलांच्या शेड्मधून बाहेर यायचे आहे. मला माझी ओळख फक्त सनी देओलचा मुलगा इथंपर्यंत मर्यादित ठेवायाची नाही. मला लोकांनी करण देओल म्हणून ओळखलं पाहिजे. स्वत:ची वेगळी ओळख मला या इंडस्ट्रित निर्माण करायची आहे.
सिनेमातील तुझ्या भूमिकेविषयी सांग, यासाठी तू कशी तयारी केलीस ?
'पल पल दिल के पास' सिनेमात मी एका हिमाचलमधील मुलाची भूमिका साकारतोय. या भूमिकेची तयारी करण्यासाठी जवळपास 3 ते 4 महिने मी हिमाचलमध्ये अॅडव्हॅंचर स्पोर्ट्सची ट्रेनिंग घेतली. त्यानंतर ही भूमिका मी साकारु शकलो.
तुला अभिनेता झाल्यावर कोणती गोष्ट आहे जी सोडावी लागली ?
मी खाण्याचा खूप शैकिन आहे. अभिनय करायला सुरुवात केल्यावर मला सगळ्यात आधी खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागले. आमचं कुटुंब पंजाबी असल्यामुळे खवैय्या आहोत. आई रोज रात्री झोपताना सांगायची बिस्किट आणि चिप्सकडे जाऊ नकोस. माझं चॉकलेट खाणं ही बंद झाले. हे सगळंच माझ्यासाठी खूप कठीण(हसून) होते.
गेल्या काही दिवसांत स्टारकिड्स डेब्यूवर अनेकांनी टीका केली, यावर तुझं काय म्हणणे आहे ?
स्टारकिड्स प्लॅटफॉर्म मिळतो हे खरं असले तरी त्यानंतर त्यांना स्वत:ला सिद्ध करावं लागतं. जर तुमचा अभिनय लोकांना आवडला नाही तर तुम्हाला नाकारले जाते. ऐवढेच नाही तर प्रेक्षक त्यानंतर तुमचे सिनेमे बघणं सुद्धा बंद करतात. त्यामुळे तुमचे काम बोललेच पाहिजे असे मला वाटते.