करण जोहरने आलिया भट्ट दिला सल्ला, म्हणाला 'या' हिरोशी कर लग्न, हा आहे बेस्ट लाईफ पार्टनर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 04:45 PM2018-08-30T16:45:05+5:302018-08-30T16:58:50+5:30

करण जोहरने सध्या रोडियो शो कॉलिंगच्या माध्यमातून सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये तो प्रत्येक प्रेमाशी संबंधीत प्रश्नाचे उत्तर देतो.

Karan johar advised aalia bhatt to marry with this hero, he is a best life partner | करण जोहरने आलिया भट्ट दिला सल्ला, म्हणाला 'या' हिरोशी कर लग्न, हा आहे बेस्ट लाईफ पार्टनर

करण जोहरने आलिया भट्ट दिला सल्ला, म्हणाला 'या' हिरोशी कर लग्न, हा आहे बेस्ट लाईफ पार्टनर

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या रणबीर आणि आलिया ब्रह्मास्त्रचे शूटिंग करतायेतआलिया व रणबीर दोघांचाही एकमेकांच्या कुटुंबासोबत खूप चांगला बॉन्ड आहे

करण जोहरने सध्या रोडियो शो कॉलिंगच्या माध्यमातून सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये तो प्रत्येक प्रेमाशी संबंधीत प्रश्नाचे उत्तर देतो. फक्त सामान्य जनताच नाही तर बॉलिवूडचे कलाकार देखील याशोमध्ये करणला फोन करुन त्याचा सल्ला घेतात.   


नुकतेच रणबीर कपूरनेकरण जोहरला फोन करून विचारले होते की, ''जर तुम्ही तुमच्या पहिल्या रिलेशनशीपमध्ये एक चुक करता आणि तिच चुक पुन्हा तुम्ही दुसऱ्या रिलेशनशीपमध्ये देखील करता तर ती सुधारण्यासाठी तुम्हाला काय केले पाहिजे ?''  


या प्रश्नाचे उत्तर देताना करण रणबीरला म्हणाला, जर तुम्ही प्रत्येक रिलेशनशीपमध्ये चुक करत असला तर तुम्हाला रिलेशनशीपच्या बाहेर यायला हवं. प्रत्येक रिलेशनशीपमध्ये तुम्ही तीच-तीच चुक पुन्हा नाही करू शकत. तुझ्या रिलेशनशीपमध्ये काही ना काही कमी नक्कीच आहे त्यामुळेच एकच चुक तुम्ही पुन्हा-पुन्हा करताये.    

यानंतर रणबीरने करणला विचारले तुला माझा गर्लफ्रेंडला काही सल्ला द्यायला का ?, यावर करण म्हणाला ''तुझ्या गर्लफ्रेंडला सांग तू जगातला सगळ्यात बेस्ट लाईफ पार्टनर आहेस. तसा हा सल्ला मी तुझा गर्लफ्रेंडला याआधीच दिलाय रणबीर. ''


सध्या रणबीर आणि आलिया ब्रह्मास्त्रचे शूटिंग करतायेत. ब्रह्मास्त्रचे शूटींग संपताच भट्ट आणि कपूर कुटुंबाने फॅमिली डिनरचा प्लान केला असल्याचे कळतेय. खरे तर आलिया व रणबीर दोघांचाही एकमेकांच्या कुटुंबासोबत खूप चांगला बॉन्ड आहे. आलिया अनेकदा रणबीरची मॉम नीतू कपूर यांच्यासोबत दिसली आहे. रणबीरची बहीण रिद्धिमा हिच्यासोबतही आलिया दिसली. 

Web Title: Karan johar advised aalia bhatt to marry with this hero, he is a best life partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.