सुशांतच्या मृत्यूनंतर करण जोहर, आलिया नेटक-यांच्या ‘हिटलिस्ट’वर, अवघ्या 20 मिनिटात इतके कमी झाले फॉलोअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 03:56 PM2020-06-17T15:56:22+5:302020-06-17T15:58:56+5:30

एकीकडे करणचे फॉलोअर्स कमी झाले असताना कंगनाच्या फॉलोअर्समध्ये मात्र वाढ झालेली दिसतेय.

Karan Johar alia bhatt's Instagram followers reduce post Sushant Singh Rajput's suicide | सुशांतच्या मृत्यूनंतर करण जोहर, आलिया नेटक-यांच्या ‘हिटलिस्ट’वर, अवघ्या 20 मिनिटात इतके कमी झाले फॉलोअर्स

सुशांतच्या मृत्यूनंतर करण जोहर, आलिया नेटक-यांच्या ‘हिटलिस्ट’वर, अवघ्या 20 मिनिटात इतके कमी झाले फॉलोअर्स

googlenewsNext
ठळक मुद्दे सुशांतच्या मृत्यूनंतर करण व त्याच्या गँगवर आरोप करणारा  व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर काही तासांमध्ये तिचे तब्बल 12 लाख फॉलोअर्स वाढले.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे. सुशांतने डिप्रेशनमधून आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. पण काहींच्या मते, सुशांत बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी ठरला. या पार्श्वभूमीवर कंगना राणौतने थेटपणे करण जोहरवर आरोप केले होते. करण जोहरने कधीच सुशांतला आपल्या पार्ट्यांना बोलावले नाही. त्याच्यासारख्या मुव्ही माफियांमुळे इंडस्ट्रीतील अनेकांवर अन्याय होतोय, अशा आशयाचा आरोप तिने केला होता. कंगनाच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर ‘बॉयकॉट करण जोहर’चा हॅशटॅग ट्रेंड होतोय. अनेकांनी करण जोहर व त्याच्या गँगवर तोंडसुख घेतले आहे. त्याच्या या गँगमध्ये आलिया भटही सामील असल्याने लोकांनी तिलाही ट्रोल केले आहे. परिणामी करण व आलियाच्या सोशल मीडियावरच्या लोकप्रियतेचा ग्राफ वेगाने खाली आलेला दिसतोय. केवळ 20 मिनिटांत करण जोहरचे 10 लाख इन्स्टा फॉलोअर्स कमी झाले आहेत. त्यापूर्वी करणचे 1 कोटी 10 लाख फॉलोअर्स होते़ मात्र आता हा आकडा 1 कोटींवर आला आहे.

आलियालाही काही तासांत सुमारे 1 लाखांवर लोकांनी अनफॉलो केले आहे. सलमान खानचेही फॉलोअर्स घटले आहेत.
सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर करणने एक पोस्ट शेअर केली होती. ‘गेल्या वर्षभरापासून मी तुझ्या संपर्कात नव्हतो. मीच दोषी आहे़ अशी चूक मी पुन्हा कधीही करणार नाही़,’असे करणने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्याची ही पोस्ट वाचूनच नेटकरी भडकले होते. नेपोटिझमला तूच खतपाणी घातलेस, आता इतका दिखावा करू नकोस, असे काय काय लोकांनी करणला या पोस्टनंतर सुनावले होते.


  
कंगनाचे फॉलोअर्स वाढले
कंगना राणौतने यापूर्वीही अनेकदा बॉलिवूडमधील नेपोटिझमला विरोध करण करण जोहरवर आरोप केले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर नेपोटिझमवर बोलणारी ती पहिली व्यक्ती होती. तिची ही ठोस भूमिका पाहून अनेक लोक तिच्या प्रेमात पडल्याचे चित्र आहे. एकीकडे करणचे फॉलोअर्स घटले असताना कंगनाच्या फॉलोअर्समध्ये मात्र वाढ झालेली दिसतेय.

 सुशांतच्या मृत्यूनंतर करण व त्याच्या गँगवर आरोप करणारा  व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर काही तासांमध्ये तिचे तब्बल 12 लाख फॉलोअर्स वाढले. यापूर्वी तिचे केवळ 20 लाख फॉलोअर्स होते. आता 32 लाखांवर लोक तिला फॉलो करत आहेत.

Read in English

Web Title: Karan Johar alia bhatt's Instagram followers reduce post Sushant Singh Rajput's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.