ऑन स्क्रीन पित्याच्या भूमिकांसाठी सज्ज झाला करण जोहर, एकताने दिली फक्कड ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 15:31 IST2020-05-06T15:20:45+5:302020-05-06T15:31:37+5:30
अनिल कपूर म्हणाला, ‘मेरे पेट पर लात क्यों मार रहे हो सर....’

ऑन स्क्रीन पित्याच्या भूमिकांसाठी सज्ज झाला करण जोहर, एकताने दिली फक्कड ऑफर
बॉलिवूडचा दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याची अॅक्टिंगची हौस त्याला स्वस्थ बसू देत नाही हेच खरे. आता तर करणने पित्याच्या भूमिकांचीही तयारी सुरु केली आहे.होय, खुद्द करणने ही माहिती दिली. करणने आपल्या पांढ-या केसांमधील लूकचा एक नवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यासोबत त्याने मजेदार कॅप्शन लिहिले आणि मग, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याच्या या फोटोवर तितक्याच मजेदार कमेंट केल्या.
‘माझी अॅक्टिंग कोरोना व्हायरसपेक्षाही धोकादायक आहे, हे मला माहित आहे. पण तरीही दुसरी संधी शोधण्यात काहीही चुकीचे नाही. तेव्हा सर्व कास्टिंग डायरेक्टर्स, रिस्क घेणारे मेकर्स आणि क्रिटीक्स शिवाय प्रेक्षकहो, मी येथे एक घोषणा करतोय की, आता मी पित्याच्या भूमिकांसाठी तयार आहे..., ’ असे करणने लिहिले.
करणने हा फोटो व पोस्ट शेअर करताच बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्यावर मजेदार कमेंट दिल्यात. अनिल कपूर यात आघाडीवर होता. ‘मेरे पेट पर लात क्यों मार रहे हो सर,’ असे अनिल कपूरने करणच्या या पोस्टवर कमेंट करताना लिहिले. याचदरम्यान टीव्हीची क्वीन एकता कपूर हिने मात्र करणला चक्क ऑफर दिली. होय, ‘माझ्याकडे एक मालिका आहे. ऋषभ बजाजचे केस पांढरे आहेत आणि तो खूप हॉटही आहे. आम्ही सर्रास या कॅरेक्टरचा चेहरा बदलतो. तेव्हा टीव्हीवर ये. आम्हाला खूप करणे अगदी सोपे आहे, ’ असे एकताने लिहिले.
कोरिओग्राफर फराह खान हिने मात्र करणची चांगलीच फिरकी घेतली. ‘तुला मेंटेन करणे तर हिरोईनपेक्षाही महागात पडेल, ’ असे तिने लिहिले.
करणने सर्वप्रथम दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमात काम केले होते. यात तो अगदीच छोट्याशा भूमिकेत दिसला होता. यानंतर ‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमात त्याने विलेनची भूमिका साकारली होती. हा सिनेमा दणकून आपटला होता. शिवाय करणच्या या चित्रपटातील भूमिकेवरही बरीच टीका झाली होती.