'स्टुडंट ऑफ द इयर 3' सिनेमा नाही तर वेबसीरिज असणार, करण जोहरने केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:29 IST2024-04-01T13:27:50+5:302024-04-01T13:29:02+5:30
स्टुडंट ऑफ द इयर 3 वेबसीरीज कोण दिग्दर्शित करणार?

'स्टुडंट ऑफ द इयर 3' सिनेमा नाही तर वेबसीरिज असणार, करण जोहरने केली घोषणा
करण जोहरच्या (Karan Johar) 'स्टुडंट ऑफ द इयर' मधून आलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा सिनेसृष्टीत आले आणि रातोरात स्टार झाले. यानंतर सिनेमाचा सिक्वेलही आला. यामध्ये टायगर श्रॉफसोबत अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांची भूमिका होती. आता तिसऱ्या भागात करण जोहर कोणाला लाँच करणार अशी चर्चा सुरु असतानाच याविषयी वेगळीच माहिती समोर आली आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर 3' (Student Of The Year 3) हा सिनेमा नाही तर वेबसीरिज असणार आहे.
सध्या ओटीटीचा जमाना आहे. अनेक वेबसीरिज रिलीज होत आहे. मोठमोठे कलाकारही आता ओटीटीकडे वळले आहेत. करण जोहरने १२ वर्षांपूर्वी 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमा आणला. सिनेमाला खूप प्रतिसाद मिळाला. नंतर दुसरा पार्टही आला. तर आता तिसऱ्या पार्टबद्दल करण जोहरने अपडेट दिलं आहे. यावेळी हा सिनेमा नाही तर वेबसीरिज असणार आहे. पुनीत मल्होत्राचा पत्ता कट झाला असून रीमा माया (Reema Maya) सीरिजचं दिग्दर्शन करणार आहे. करण जोहरने नुकतंच चंदीगढमध्ये आयोजित Cinevesture International Film Festival मध्ये SOTY बद्दल खुलासा केला. तो म्हणाला, "आम्ही तिसऱ्या भाग वेबसीरिज रुपात आणण्याचं प्लॅनिंग करत आहे. याची दिग्दर्शनाची धुरा रीमा मायाकडे आहे."
तो पुढे म्हणाला, "नवे दिग्दर्शक आणि लेखकांची टीम स्टुडंट ऑफ द इयर'च्या डिजिटल वर्जनचं दिग्दर्शन करेल. हे माझ्या नाही पूर्णपणे त्यांच्या पद्धतीप्रमाणेच होईल. कारण मी जर रीमा मायाच्या जगात प्रवेश केला तर मी याला आणखी भ्रमित करेल जो तिच्या नावाचाच अर्थ आहे. हा तिचाच आवाज असला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. ही तिचीच सीरिज असेल."
कोण आहे रीमा माया?
रीमा माया लेखिका, दिग्दर्शिका आणि Catnip प्रोडक्शन हाऊसची को फाऊंडर आहे. ती स्वतंत्र फिल्ममेकर आहे. 'नॉक्टर्नल बर्गर' साठी तिचं सनडांस फिल्म फेस्टिव्हलमध्ये कौतुक झालं.