Karan Johar big announcement: आर्यन खान, खुशी कपूर की इब्राहिम? कुणाला लॉन्च करतोय करण जोहर, उद्या मोठी घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 19:54 IST2022-03-02T19:52:53+5:302022-03-02T19:54:18+5:30
चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एकापाठोपाठ एक मोठ्या प्रोजेक्ट्सची घोषणा तो करत आहे. यात आता करण जोहर पुन्हा एकदा एक मोठं सरप्राइज देण्यास सज्ज आहे.

Karan Johar big announcement: आर्यन खान, खुशी कपूर की इब्राहिम? कुणाला लॉन्च करतोय करण जोहर, उद्या मोठी घोषणा!
चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एकापाठोपाठ एक मोठ्या प्रोजेक्ट्सची घोषणा तो करत आहे. यात आता करण जोहर पुन्हा एकदा एक मोठं सरप्राइज देण्यास सज्ज आहे. त्यानं एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात त्यानं ३ मार्च रोजी तो तीन नव्या चेहऱ्यांना लाँच करणार असल्याचं म्हटलं आहे. करणनं व्हिडिओ शेअर करताच त्यावर प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झाली आहे. तसंच बॉलीवूड वर्तुळात चर्चांना सुरूवात झाली आहे.
करणनं जेव्हापासून तीन नव्या चेहऱ्यांना लाँच करण्याची घोषणा केली आहे तेव्हापासून तो युझर्सच्या निशाण्यावर आला आहे. ट्रोलर्स देखील सक्रिय झाले आहेत. "आता कोणत्या स्टारच्या मुलांना लाँच करणार आहेस?", अशी कमेंट काही युझर्सनं केली आहे. "या व्हिडिओमध्ये जितके अभिनेते दिसत आहेत ते एकतर बॉलीवूडशी किंवा स्टार कुटुंबाशी निगडीत आहेत. बॉलीवूडमधील कुटुंबांच्या पलिकडेपण एक जग आहे जिथं खूप टँलेंट भरलेलं आहे. तिथंही लक्ष दे", असं एका यूझरनं म्हटलं आहे.
काहींनी तर करण जोहर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचं लाँन्चिंग करणार असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम याचं लाँन्चिंग करणार असल्याचा कयास व्यक्त केला आहे. एका युझरनं शनाया कपूर,सुहाना खान आणि आर्यन खान यापैकी कोणत्यातरी एका स्टारला लाँच करण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.