Agneepath फ्लॉप झाल्यानंतर अशी झाली होती यश जोहर यांची अवस्था,तो किस्सा सांगताना करण जोहर झाला भावूक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 13:46 IST2022-01-19T13:35:56+5:302022-01-19T13:46:59+5:30
करण जोहर(karan johar)ने इतक्या वर्षांनी याचा खुलासा केला आहे.

Agneepath फ्लॉप झाल्यानंतर अशी झाली होती यश जोहर यांची अवस्था,तो किस्सा सांगताना करण जोहर झाला भावूक...
Karan Johar Hunarbaaz: 1990 साली प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन यांचा 'अग्निपथ' हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील महत्त्वाच्या सिनेमांपैकी एक असेल, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकुल चंद यांनी केले होते आणि यश जोहर यांनी निर्मिती केली होती. अमिताभ यांचा 'अग्निपथ' यश जोहर यांच्या अगदी जवळ होता, त्यामुळे जेव्हा हा चित्रपट फ्लॉप झाला तेव्हा यश जोहरलुद्धा तुटले होते.
करण जोहर(karan johar)ने इतक्या वर्षांनी याचा खुलासा केला आहे. तो काळ आठवून करण जोहर(karan johar) भावूक झाला आणि म्हणाला की, 'अग्निपथ' फ्लॉप झाल्यानंतर 'वडीलचं मनं नाराज झालं होतं. त्यानंतर करण जोहरने २०१२ मध्ये पुन्हा अग्निपथ बनवला जो हिट ठरला.
करण जोहर लवकरच कलर्सचा रिअॅलिटी शो हुनरबाजमध्ये दिसणार आहे. शो चार दिवसांनी म्हणजेच २२ जानेवारीला सुरू होणार आहे, पण त्याआधी कलर्सने त्याच्या इंस्टाग्रामवर शोचे काही प्रोमो शेअर केले आहेत. काही प्रोमोमध्ये करण खूप मस्ती करताना दिसत आहे तर काहींमध्ये तो इमोशनल होताना दिसत आहे.
नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये, एक लहान मूल नवीन 'अग्निपथ' मधील 'अभी मुझे मैं कहें' या प्रसिद्ध गाणं बासरीवर वाजवताना दिसत आहे. हे गाणं ऐकून करण रडतो आणि म्हणतो, 'हे गाणं ऐकून मी भावूक झालो...हा चित्रपट पापांच्या हृदयाच्या खूप जवळ होता, त्यामुळे जेव्हा हा सिनेमा फ्लॉप झाला तेव्हा ते नाराज झाले होते. त्यानंतर आम्ही हा चित्रपट पुन्हा केला....