'मी गे होतो म्हणून शाळेत..." लहानपणीच्या आठवणी सांगताना करण जोहर भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 09:35 AM2023-08-30T09:35:22+5:302023-08-30T09:38:25+5:30
आज किती जरी यशस्वी दिसत असला तरी करणला स्वत:चं खरं पचवण्यासाठी लहानपणी खूप काही सोसावं लागलं होतं.
करण जोहर (Karan Johar) बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माता आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कुछ कुछ होता है','कभी खुशी कभी गम' सारखे एकापेक्षा एक चित्रपट त्याने दिले. मात्र त्याचं बालपण अजिबातच सोपं नव्हतं. त्याने शाळेतल्या आठवणींबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. आज किती जरी यशस्वी दिसत असला तरी करणला स्वत:चं खरं पचवण्यासाठी लहानपणी खूप काही सोसावं लागलं होतं.
निखिल तनेजाच्या 'बी अ मॅन यार' या शोमध्ये करण जोहरने हजेरी लावली. यावेळी करण म्हणाला,'मी १० वीत असताना एका मुलीसोबत प्रेमाचं नाटक केलं होतं. तिचं नाव शलाका होतं. आज आपण ज्याला गे, फाग, होमो ही नावं वापरतो, याला तेव्हाच्या काळी अपमानजनकरित्या पैंसी असं म्हटलं जायचं. हा असा शब्द होता ज्याने मला अंधारात ढकललं होतं. केवळ शाहरुख खान असा व्यक्ती आहे ज्याने कधीच मला वाईट वाटू दिलं नाही.'
करणने बऱ्याचदा तो गे असल्याचं मान्य केलं आहे. यावरुन अनेक ठिकाणी त्याची खिल्लीही उडवली जाते. मात्र त्याने सत्य स्वीकारत आज हे यश मिळवलं आहे. काही वर्षांपूर्वीच त्याने यश आणि रुही या दोन मुलांना दत्तक घेतलं. गेल्या २५ वर्षांपासून तो सिनेइंडस्ट्रीत आहे. करण जोहर सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चं यश एन्जॉय करत आहे. आता त्याचा आगामी 'योद्धा', 'मिस्टर अँड मिसेस माही', 'मेरे महबूब मेरे सनम' हे चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.