Koffee With Karan Season 7:   बाबो! ‘कॉफी विद करण 7’च्या एका एपिसोडसाठी करण जोहरनं घेतले इतके कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 06:01 PM2022-06-29T18:01:48+5:302022-06-29T18:02:41+5:30

Koffee With Karan Season 7: ‘कॉफी विद करण’ हा लोकप्रिय सेलिब्रिटी टॉक शो. लवकरच या शोचा 7 वा सीझन येतोय. येत्या 7 जुलैपासून हा शो सुरू होतोय.

karan johar getting to host koffee with karan 7 fees per episode | Koffee With Karan Season 7:   बाबो! ‘कॉफी विद करण 7’च्या एका एपिसोडसाठी करण जोहरनं घेतले इतके कोटी!!

Koffee With Karan Season 7:   बाबो! ‘कॉफी विद करण 7’च्या एका एपिसोडसाठी करण जोहरनं घेतले इतके कोटी!!

googlenewsNext

 Koffee With Karan Season 7: ‘कॉफी विद करण’ हा लोकप्रिय सेलिब्रिटी टॉक शो. लवकरच या शोचा 7 वा सीझन येतोय. येत्या 7 जुलैपासून  डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा शो सुरू होतोय. ‘कॉफी विद करण’चे सर्व सहा सीझन हिट झालेत. याचं मोठं क्रेडिट करण जोहरला जातं.  7 वा सीझनही करण जोहर (Karan Johar ) होस्ट करतोय आणि यासाठी त्याने तगडी फी वसूल केली आहे.

‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कॉफी विद करण’च्या एका एपिसोडसाठ करण जोहरने 1 ते 2 कोटी रूपये चार्ज केले आहेत. प्रत्येक सीझनमध्ये करण कमीत 20 एपिसोड होस्ट करतो. 7 व्या सीझनमध्येही 20 एपिसोड असतील तर या संपूर्ण सीझनमधून करण सुमारे 40 कोटी रूपयांची कमाई करणार आहे.

अद्याप ‘कॉफी विद करण 7’ सुरू झालेला नाही. पण सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे. आधी हा शो टीव्हीवर टेलिकास्ट व्हायचा. पण यावेळी तो ओटीटीवर स्ट्रिम होणार आहे. या सीझनचा पहिला सेलिब्रिटी गेस्ट कोण असेल? यावरही चर्चा सुरू आहे. चर्चा खरी मानाल तर या सीझनमध्ये साऊथचे बडे स्टार्स हजेरी लावू शकतात.  रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडा अशा अनेक साऊथ स्टार्सची नावं सध्या चर्चेत आहेत.

‘कॉफी विद करण’चा पहिला सीझन 2004 साली आला होता. बॉलिवूडचे सेलिब्रिटींसोबत करणच्या गप्पा, चर्चा, मजेशीर खुलासे असं सगळं प्रेक्षकांना भावलं होतं. याचा सहावा सीझन 2019 मध्ये टेलिकास्ट झाला होता.

Web Title: karan johar getting to host koffee with karan 7 fees per episode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.