Karan Johar Kids: आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो? मुलांच्या प्रश्नांमुळे करण जोहर हैराण; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 12:22 PM2024-07-08T12:22:09+5:302024-07-08T12:22:31+5:30

Karan Johar Kids: पालक होणं खूपच कठीण आहे. मी एकुलता एक मुलगा आहे आणि आता सिंगल फादर आहे.

Karan Johar kids asking him about their birth mother director taking help of counsellor | Karan Johar Kids: आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो? मुलांच्या प्रश्नांमुळे करण जोहर हैराण; म्हणाला...

Karan Johar Kids: आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो? मुलांच्या प्रश्नांमुळे करण जोहर हैराण; म्हणाला...

करण जोहर (Karan Johar) बॉलिवूडमधला सर्वात प्रतिभावान दिग्दर्शक, निर्माता आहे. 'कुछ कुछ होता है' ते 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सारखे अनेक हिट सिनेमे त्याने दिले. धर्मा प्रोडक्शनखाली त्याने कित्येक सिनेमांची निर्मिती केली. हे चित्रपट बॉक्सऑफिसवर गाजले. करण प्रोफेशनलसोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याला यश आणि रुही ही जुळी मुलं आहेत. सरोगसीच्या माध्यमातून त्यांचा जन्म झाला. आता त्याची मुलं आमची आई कोण आहे? असा प्रश्न विचारत असून याला करण कसं सामोरं जातोय याचा नुकताच त्याने खुलासा केला.

फाये डिसूजाला दिलेल्या मुलाखतीत करण जोहर म्हणाला, "आता आपली मॉडर्न फॅमिली आहे त्यामुळे माझी मुलं मला प्रश्न विचारु लागली आहेत. कोणाच्या पोटी आमचा जन्म झाला? मम्मा आमची आई नाही ती तर आमची आजी आहे. आमची आई कोण? असे प्रश्न आता येऊ लागले आहेत.  या प्रश्नांना कसा सामोरं जाऊ यासाठी मी स्वत: काऊंसिलरकडे जात आहे. पालक होणं खूपच कठीण आहे. मी एकुलता एक मुलगा आहे आणि आता सिंगल फादर आहे. मला वाटतं माझ्या घरात तीन मुलं आहेत. कारण माझी आई आता 81 वर्षांची आहे. त्यामुळे मुलं आणि आई यांच्यामध्ये मी कधी कधी अडकतो. पण मी स्वत:ला तितकंच भाग्यवान समजतो."

करण जोहरने पहिल्यांदाच त्याच्या घरातील या गोष्टी खुलेपणाने मान्य केल्या आहेत. दोन मुलांचा तो एकट्याने सांभाळ करतो आहे. तसंच त्याची ८१ वर्षांची आईही मुलांना सांभाळत आहे. मुलांच्या प्रश्नांना मात्र आता करणला सामोरं जावं लागत आहे. २०१७ साली सरोगसीद्वारे यश आणि रुहीचा जन्म झाला. सध्या दोघंही ७ वर्षांचे आहेत.

Web Title: Karan Johar kids asking him about their birth mother director taking help of counsellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.