Dhadak 2 : करण जोहरच्या 'धडक २' मधून जान्हवी-ईशानचा पत्ता कट? 'या' फ्रेश जोडीची झाली एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 13:37 IST2023-04-18T13:33:59+5:302023-04-18T13:37:34+5:30
'धडक' हा सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट' चा रिमेक होता.

Dhadak 2 : करण जोहरच्या 'धडक २' मधून जान्हवी-ईशानचा पत्ता कट? 'या' फ्रेश जोडीची झाली एंट्री
Dhadak 2 : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध निर्माता करण जोहरने (Karan Johar) काही वर्षांपूर्वी जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आणि ईशान खट्टर (Ishan Khattar) या दोन्ही स्टारकिड्सला 'धडक' सिनेमातून लॉंच केले. आता करण 'धडक २' घेऊन येणार आहे. मात्र या सिक्वलमधून जान्हवी आणि ईशानला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
'धडक' हा सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट' चा रिमेक होता. माध्यम रिपोर्टनुसार करण जोहर आता 'धडक 2' बनवण्याचे नियोजन करत आहे. मात्र सिक्वलमध्ये फ्रेश जोडी घेण्याचा त्याचा विचार आहे. यासाठी अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांना साईन करण्यात आलंय. करण जोहर बॅनरखाली बनवण्यात येणारा या सिनेमाचं शाजिया इकबाल दिग्दर्शन करणार आहेत. ही त्यांची पहिलीच बॉलिवूड फिल्म असेल.
याचाच अर्थ 'धडक'च्या सिक्वलमधून जान्हवी आणि ईशानचा पत्ता कट झाला आहे. करण जोहर ज्या ज्या कलाकारांना लॉंच करतो ते स्टार बनतात. सध्या 'गली बॉय' फेम सिद्धांत चतुर्वेदीचं करिअर डगमगलं आहेय त्यामुळे 'धडक 2' त्याच्यासाठी खास असणार आहे. तर तृप्ती डिमरीने नेटफ्लिक्सवरील 'कला' या सिनेमातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. या सिनेमात तिच्या अभिनयाचं समीक्षकांनीही कौतुक केलंय.