करण जोहर घेऊन येतोय 'चॉंद मेरा दिल'; अनन्या पांडेसोबत हा अभिनेता प्रमुख भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 04:10 PM2024-11-07T16:10:16+5:302024-11-07T16:13:41+5:30

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा नवा चित्रपट लवकरच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

karan johar new film chand mera dil actress ananya pandey and lakshya play lead role in movie first look out | करण जोहर घेऊन येतोय 'चॉंद मेरा दिल'; अनन्या पांडेसोबत हा अभिनेता प्रमुख भूमिकेत

करण जोहर घेऊन येतोय 'चॉंद मेरा दिल'; अनन्या पांडेसोबत हा अभिनेता प्रमुख भूमिकेत

Chanad Mera Dil : बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने (Karan Johar) धर्मा प्रोडक्शनच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. नुकतंच नवीन चित्रपटाच्या पोस्टर इमेजची झलक दाखवण्यात आली आहे. चित्रपटात अभिनेत्री अनन्या (Ananya Pandey) पांडेसोबत लक्ष लालवानी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकतीच करणने या सिनेमाचं पोस्टर इमेज शेअर केली आहे. २०२५ मध्ये 'चॉंद मेरा दिल' थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येईल.


विवेक सोनी दिग्दर्शित  रोमॅंटिक ड्रामा असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर करण जोहर या चित्रपटाचा निर्माता आहे. "प्यार में थोडा पडता हैं..." असं कॅप्शन देत अनन्या-लक्षने सिनेमाची पोस्टर इमेज शेअर केल्याचं पाहायला मिळतंय. करण जोहरनेही त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंवरून या सिनेमाबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. "हमारे पास दो चॉंद हैं जो एक ऐसी गहन और भावुक प्रेम कहानी लाने के लिए तैयार है जो किसी और जैसी नहीं है!" असं कॅप्शन देत नव्या चित्रपटातच्या पोस्टर इमेजची झलक दाखवली आहे. करण जोहरने चित्रपटाच्या चार पोस्टर इमेज शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये अनन्या आणि लक्ष रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळतोय. 

अभिनेत्री अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अलिकडे अभिनेत्री 'CTRL' या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत होता. तर लक्ष लालवानीने २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'किल' या सिनेमात झळकला होता.  

Web Title: karan johar new film chand mera dil actress ananya pandey and lakshya play lead role in movie first look out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.