'लोकांनी माझे कपडे उतरवलेच...' करण जोहर म्हणाला, "आईलाही झाला ट्रोलिंगचा त्रास"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 04:36 PM2023-08-09T16:36:57+5:302023-08-09T16:37:52+5:30

गेल्या तीन वर्षात लोकांनी माझ्याबद्दल खूप द्वेष पसरवला.

karan johar opens up on trollers who trolled him badly in the last 3 years | 'लोकांनी माझे कपडे उतरवलेच...' करण जोहर म्हणाला, "आईलाही झाला ट्रोलिंगचा त्रास"

'लोकांनी माझे कपडे उतरवलेच...' करण जोहर म्हणाला, "आईलाही झाला ट्रोलिंगचा त्रास"

googlenewsNext

करण जोहर (Karan Johar) बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आहे.  २५ वर्षांपासून त्याने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. करण जोहर सोशस मीडियावर सतत ट्रोलही होत राहतो. अनेकांसोबतचे त्याचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. मात्र या सगळ्याचा त्याची आई हिरु जोहरवरही परिणाम व्हायचा असं त्याने सांगितलं. करणला 'मूव्ही माफिया' म्हणून ओळख मिळाली. कंगनाने त्याच्यावर अनेक आरोप केले. मात्र या सगळ्यात करणची आई त्याच्यामागे खंबीरपणे उभी होती.

करण जोहरने एका मुलाखतीत सांगितले, 'गेल्या तीन वर्षात लोकांनी माझ्याबद्दल खूप द्वेष पसरवला. याचा फक्त माझ्यावर नाही तर माझ्या आईवरही परिणाम झाला. मी तिला दु:खी होताना पाहिलं आहे कारण तिला टीव्ही पाहायची सवय होती. ती माझ्याबाबत छापून आलेल्या नकारात्मक बातम्या वाचायची. टीव्ही अँकर्सला ओरडताना पाहायची.'

तो पुढे म्हणाला, 'जेव्हा सगळे मला ट्रोल करत होते तेव्हा मला आईसाठी खंबीर राहावं लागलं. लोकांनी तर माझे कपडे काढलेच होते आता काय लपवायचं? कोणाशी लढायचं? प्रत्येक जण अचानक माझ्या आयुष्यात येऊन माझ्याविषयी काहीतरी धारणा बनवायचे. जेव्हा की त्यांना माहितही नाही की मी नक्की कसा माणूस आहे.'

सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर कंगना रणौतने एक व्हिडिओ शेअर करत करण जोहरला मूव्ही माफिया म्हटले होते. यानंतर सोशल मीडियावर करण जोहरच्या विरोधात एक लाट आली. करणलाच सुशांतच्या मृत्यूला जबाबदार ठरवण्यात येऊ लागलं होतं. त्याला बॉयकॉट केलं गेलं. नेपोटिझमचा आरोप केला गेला. नुकताच करणचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' रिलीज झाला आहे. ७ वर्षांनी करणने सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

Web Title: karan johar opens up on trollers who trolled him badly in the last 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.