NCBच्या रडारवर आता करण जोहरची 'ती' पार्टी, ड्रग्सचा वापर केल्याचा संशय

By गीतांजली | Published: September 25, 2020 06:11 PM2020-09-25T18:11:53+5:302020-09-25T18:24:37+5:30

या पार्टीत उपस्थित लोकसुद्धा NCBच्या रडावर येऊ शकतात.

karan johar party viral video also under radar of ncb | NCBच्या रडारवर आता करण जोहरची 'ती' पार्टी, ड्रग्सचा वापर केल्याचा संशय

NCBच्या रडारवर आता करण जोहरची 'ती' पार्टी, ड्रग्सचा वापर केल्याचा संशय

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगलसमोर आल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक नाव एनसीबीच्या रडारवर आहेत. आजतकच्या रिपोर्टनुसार आत करण जोहरच्या घरी 27 जुलै 2019 ला झालेली पार्टी एनसीबीच्या निशाण्यावर आहे. एनसीबीला संशय आहे या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला आहे. या पार्टीत कोकेन घेतल्याचा संशय एनसीबीला आहे. या पार्टीत उपस्थित लोकसुद्धा NCBच्या रडावर येऊ शकतात. 

करण जोहरच्या पार्टीवर NCBची नजर
पार्टीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी होताना दिसतायेत, ज्यामुळे या पार्टीत ड्रग्सचा वापर झाल्याचा संशय बळावला आहे. 27 जुलैला झालेल्या या पार्टीत एनसीबीला कोकेना घेतल्याचा संशय आहे.  करण जोहरच्या या पार्टीत दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, विकी कौशल सारख्या अनेक कलाकार सामील होते. या पार्टीचा व्हिडीओ करण जोहरने 28 जुलैला 2019ला  शेअर केला होता. 


 
रकुल प्रीत सिंगच्या चौकशीनंतर यापार्टीची चौकशी सुरु केली जाणार आहे. रकुलनंतर एनसीबी ऑफिसमध्ये केपीएस मल्होत्रा आणि धर्मा प्रॉडक्शन कंपनीचा सहसंचालक क्षितिज प्रसाद यांची चौकशी सुरु आहे. एका ड्रग्स पेडलरच्या चौकशीत क्षितिज प्रसादचे नाव समोर आले होते. 

दीपिकाची शनिवारी होणार एनसीबीसमोर चौकशी 
दीपिकाचे नाव ही ड्रग्स कनेक्शनमध्ये समोर आले आहे. एनसीबीने दीपिकाला समन्स पाठवून शनिवारी चौकशीसाठी बोलवलं आहे. रणवीर सिंहने एनसीबीकडे विनंती केली होती की, त्यालाही चौकशी दरम्यान दीपिकासोबत राहण्याची परवानगी द्यावी. पण आता यावर एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांच्याकडे अशाप्रकारची कोणतीही रिक्वेस्ट आलेली नाही. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, समन्स केवळ दीपिका पादुकोणला पाठवण्यात आला आहे. एनसीबी केवळ तिची चौकशी करेल.तसेच रणवीर सिंहकडून कोणत्याही प्रकारची विनंती एनसीबीला करण्यात आलेली नाही. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, समन्स केवळ दीपिका पादुकोणला पाठवण्यात आला आहे. एनसीबी केवळ तिची चौकशी करेल. तो कथितपणे म्हणाला होता की, दीपिका नर्व्हस होते त्यामुळे त्यालाही चौकशीदरम्यान तिच्यासोबत येऊ द्यावे. एनसीबीने या बातमीचं खंडन केलंय.

Web Title: karan johar party viral video also under radar of ncb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.