'गदर 2' च्या यशावर करण जोहरची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला, "सिंगल स्क्रीन्ससाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 08:55 AM2023-08-22T08:55:21+5:302023-08-22T08:56:30+5:30

सनी देओल 'गदर 2' ने सर्वांनाच धक्का दिला आहे.

Karan Johar praised sunny deol s gadar 2 success says happy for single screen theatres | 'गदर 2' च्या यशावर करण जोहरची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला, "सिंगल स्क्रीन्ससाठी..."

'गदर 2' च्या यशावर करण जोहरची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला, "सिंगल स्क्रीन्ससाठी..."

googlenewsNext

मध्यंतरी बॉलिवूडचा कठीण काळ सुरु आहे असं चित्र होतं. कोरोनानंतर बॉलिवूड डबघाईला आलं होतं. तर दुसरीकडे साऊथ फिल्मचा डंका जगभर सुरु झाला. मात्र आता चित्र बदललं आहे. बॉलिवूड पूर्णपणे सावरलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरलाही (Karan Johar) बॉलिवूडच्या परिस्थितीची काळजी वाटत होती असं तो अनेक मुलाखतींमध्ये बोलला होता. आता त्याचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमा तुफान चालला. तर सध्या सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2)  बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सनीचं हे यश पाहता करण जोहरने सुद्धा त्याची तारीफ केली आहे.

११ ऑगस्टला रिलीज झालेल्या 'गदर 2' ने १० दिवसातच ३०० कोटींचा टप्पा पार केला. 'गदर 2'च्या यशाने सर्वांचीच बोलती बंद केली. करण जोहरलाही सनी देओलची स्तुती करण्याचा मोह आवरला नाही. नुकत्याच एका मुलाखतीत करण जोहर म्हणाला, ''गदर 2 ने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. कारण हा एक असा सिनेमा आहे जो २००१ मध्ये सुपरहिट झाला होता आणि आता २०२३ मध्ये रेकॉर्ड तोडत आहे. मी सिंगल स्क्रीन्ससाठी खूप खूश आहे.''

सनी देओलचा मोबाईल करण जोहरच्या हाती लागला तर काय करणार असं विचारलं असता करण मजेतच म्हणाला, ''मी सर्व फिल्मइंडस्ट्रीला मेसेज करेन आणि सांगेन की हे असंच केलं जातं.''

करण जोहर प्रेक्षकांना वचन देत म्हणाला, ''आज जे सिनेमे चालत आहेत ते तुमच्या विश्वासामुळेच. मी यासाठी कोणाकडेच मान्यता मागत नाहीए. ना सोशल मीडियाकडे ना की फिल्म समीक्षकांकडे. प्रत्येकजण संवेदनांना आकर्षित करण्यासाठी फिल्म बनवत आहे. भविष्यातही असंच किंवा यापेक्षा जास्त होणार आहे. प्रत्येक वर्षी अशीच लाट येईल.''

Web Title: Karan Johar praised sunny deol s gadar 2 success says happy for single screen theatres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.