आयुष्यात फक्त 'दीड रिलेशनशिप' मध्ये होता करण जोहर; म्हणाला, "४० व्या वर्षापर्यंत मी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 10:23 AM2024-07-10T10:23:09+5:302024-07-10T10:24:24+5:30

नुकतंच करणने आपल्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला.

Karan Johar reveals he was in only one and a half relationships in his entire life now enjoying single status | आयुष्यात फक्त 'दीड रिलेशनशिप' मध्ये होता करण जोहर; म्हणाला, "४० व्या वर्षापर्यंत मी..."

आयुष्यात फक्त 'दीड रिलेशनशिप' मध्ये होता करण जोहर; म्हणाला, "४० व्या वर्षापर्यंत मी..."

करण जोहर (Karan Johar) गेल्या ३० वर्षांपासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. तो एक यशस्वी निर्माता, दिग्दर्शक आहे. करण जोहरसोबत काम करण्याचं अनेक कलाकारांचं स्वप्नच असतं. करण आपल्या धर्मा प्रोडक्शनखाली एका पेक्षा एक सिनेमांची निर्मिती केली दिग्दर्शितही केले. नुकतंच त्याने आपल्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला. सध्या तो सिंगल असून मध्यंतरी दीड रिलेशनशिपमध्ये होता असं तो म्हणाला.

फाये डिसूझाच्या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत करण जोहर म्हणाला, "मी बऱ्याच वर्षांपासून सिंगल आहे. किती वर्ष झाले मी रिलेशनशिपमध्येच आलो नाही. उलट संपूर्ण आयुष्यात माझं फक्त दीड रिलेशनशिप  झालं असेल. पण सिंगल स्टेटस मी किती एन्जॉय करतोय हे मी शब्दात सांगू शकत नाही. आता मला हे बदलायचंही नाही. बाथरुम, बेडरुम, स्पेस, शेड्युल हे सगळं शेअर करणं दूरच राहिलं पण तुमच्या प्रत्येक दिवसाची ताकद ही तुमच्याजवळ आहे. आई आणि मुलांप्रती माझ्यावर जबाबदारी आहे. मी मला हवं ते करु शकतो."

तो पुढे म्हणाला," ४० वर्षांचा झाल्यानंतर मला पार्टनरची कमी जाणवली नाही. आज मी ५२ वर्षांचा आहे आणि आता मला पार्टनर नकोय. मी सगळं केलं ब्लाईंड डेट, रिलेशनशिप पण आता ते सगळं करायची इच्छा नाही. स्वत:च्या आनंदासाठी मला कोणावर अवलंबून राहायचं नाही. कोणाची गरज असेल तर माझ्या आयुष्यात माझे मित्र आहेत. माझी मुलं आहेत. त्यामुळे प्रेम मला सगळीकडून मिळतंय. त्यामुळे फक्त प्रेम आहे म्हणून लग्न करु नका असंच मी प्रत्येकाला सांगतो."

Web Title: Karan Johar reveals he was in only one and a half relationships in his entire life now enjoying single status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.