'माझ्या आईला सूनेची गरज नाही'; सूनेला टाइमपास म्हणणाऱ्या युजरवर भडकला करण जोहर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 10:00 IST2023-12-29T09:59:00+5:302023-12-29T10:00:55+5:30
Karan johar: अलिकडेच एका युजरने करणला 'घरी सून आण म्हणजे तुझ्या आईचा टाइमपास होईल', असा सल्ला दिला होता.

'माझ्या आईला सूनेची गरज नाही'; सूनेला टाइमपास म्हणणाऱ्या युजरवर भडकला करण जोहर
निर्मात-दिग्दर्शक करण जोहर (karan johar) याचे सिनेमा जितके गाजतात त्याच्या कैकपटीने जास्त तो वादविवादांमुळे चर्चेत येत असतो. यात बऱ्याचदा त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. पण,दरवेळी करण ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देऊन त्यांची तोंड बंद करत असतो. यावेळी सुद्धा त्याने असंच केलं आहे. या युजरने करणला लग्न करण्याविषयी सल्ला दिला होता. मात्र, त्याने ज्या पद्धतीने हा सल्ला दिला ते पाहून करण चांगलाच संतापला. परिणामी, करणने या युजरला चांगलंच सुनावलं आहे.
अलिकडेच एका युजरने करणला 'घरी सून आण म्हणजे तुझ्या आईचा टाइमपास होईल', असा सल्ला दिला होता. हा सल्ला ऐकल्यावर करण चांगलाच संतापला. ज्यामुळे त्याने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत या युजरची शाळा घेतली.
काय म्हणाला करण?
"कोणतीही सून कोणत्याही सासूसाठी टाईमपास बनू नये आणि सूनेची स्वत:ची एक ओळख असते. माझ्या आयुष्यातील निवडीबद्दल किंवा माझ्या जगण्याच्या पद्धतीबद्दल मला आतापर्यंत ज्या काही शिव्या, ट्रोलिंग किंवा टीका झाल्या त्या सगळ्यात या अशा पद्धतीच्या कमेंट्स आक्षेपार्ह वाटतात. सगळ्यात पहिले कोणत्याही सूनेने कोणाच्याही आईसाठी टाइमपास ठरु नये. एखाद्या सूनेला तिचा वेळ हा तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल कामासाठी वापरता आला पाहिजे", असं करण म्हणाला.
पुढे तो म्हणतो, ''माझी आई माझ्या मुलांसोबत यश आणि रुही यांच्यासोबत खूश आहे. त्यांची काळजी घेते, त्यामुळे तिला कोणत्याही टाईमपासची गरज नाही. नातवंडांकडून मिळालेल्या प्रेमामुळे तिचं आयुष्य पूर्ण झालं आहे. माझ्या नात्याबद्दल किंवा तिच्या स्थितीबद्दल ज्यांना काळजी आहे, त्यासाठी मला सून आणणं हा काही पर्याय नाहीये. माझ्या मुलांना माझ्या आईचं मार्गदर्शन मिळतंय यातच ते खूप भाग्यवान आहेत.''