करण जोहर म्हणतो, आता मला फरक पडत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 11:51 AM2019-03-20T11:51:05+5:302019-03-20T11:51:19+5:30

करण जोहर सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशान्यावर आला. पण या टीकेला घाबरून करणने बोलणे थांबवले नाही. अलीकडे अरबाज खानच्या शोवर करण पुन्हा एकदा बोलला.

karan johar on troll and sexuality in arbaz khan show pinch | करण जोहर म्हणतो, आता मला फरक पडत नाही!

करण जोहर म्हणतो, आता मला फरक पडत नाही!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘द अनस्युटेबल बॉय’या आपल्या बायोग्राफीत करणने अनेक खुलासे केले आहेत.

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सर्वप्रथम ‘द अनस्युटेबल बॉय’ या बायोग्राफीत आपल्या सेक्सुअ‍ॅलिटीबद्दल बोलला. यानंतर अनेकप्रसंगी तो आपल्या सेक्सुअ‍ॅलिटीबद्दल बोलताना दिसला. अर्थातच यासाठी करणला वेळोवेळी मोठी किंमत चुकवावी लागली. सोशल मीडियावर तो ट्रोलर्सच्या निशान्यावर आला. पण या टीकेला घाबरून करणने बोलणे थांबवले नाही. अलीकडे अरबाज खानच्या शोवर करण पुन्हा एकदा बोलला.


सोशल मीडियावर मला प्रचंड ट्रोल केले गेले. आधी या टीकेमुुळे मला वाईट वाटायचे. संताप यायचा. पण यानंतर अशी एक वेळ आली की, या सगळ्यांचा माझ्यावर काहीच परिणाम होईनासा झाला. आता मी ट्रोलर्सच्या टीकेमुळे अस्वस्थ होत नाही तर उलट या टीकेमुळे माझे मनोरंजन होते. रोज सकाळी मी उठतो आणि शिव्या खातो, मग हसतो. तुम्हाला माझ्या सेक्सुअ‍ॅलिटीबद्दल जे बोलायचे ते बोला. जितक्या शिव्या द्यायच्या त्या द्या. मला याने काहीही फरक पडत नाही. माझ्या मते, या शिव्या देणाऱ्यांचा मेंदू आजारी आहे. मी त्यावर काय बोलणार, असे करण यावेळी म्हणाला.


‘द अनस्युटेबल बॉय’या आपल्या बायोग्राफीत करणने अनेक खुलासे केले आहेत. ‘मी कोण आहे, यावर मला काहीही बोलायचे नाही. कारण माझा जन्म सेक्स विषयावर चर्चा करण्यासाठी झालेला नाही.अनेक लोक माझ्या सेक्स लाईफबद्धल माहिती मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण, याविषयी मला काही ओरडून सांगणे गरजेचे नाही. मी अशा देशात राहतो, जेथे मी काही गोष्टी सांगितल्यास मला तुरुंगात जावे लागू शकते. मी २६ वर्षांचा असताना व्हर्जिनिटी गमाविली. हे सांगताना मला अभिमान वाटत नाही. मी तेव्हा न्यूयॉर्कमध्ये होतो, माझा तो पहिला अनुभव होता’, असे त्याने यात लिहिले आहे.

Web Title: karan johar on troll and sexuality in arbaz khan show pinch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.