करण जोहरची स्वप्नपूर्ती! मादाम तुसादमध्ये मेणाचा पुतळा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 12:39 PM2019-04-04T12:39:21+5:302019-04-04T12:43:11+5:30

सिंगापूरच्या मादाम तुसाद संग्रहालयात करणचा मेणाचा पुतळा उभारण्यात आलाय. अलीकडे करणने या पुतळ्याचे अनावरण केले.

Karan Johar unveils his wax statue at Madame Tussauds Singapore along with mom Hiroo | करण जोहरची स्वप्नपूर्ती! मादाम तुसादमध्ये मेणाचा पुतळा!!

करण जोहरची स्वप्नपूर्ती! मादाम तुसादमध्ये मेणाचा पुतळा!!

googlenewsNext
ठळक मुद्देकरणने आदित्य चोप्राच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटामध्ये शाहरूख खानच्या मित्राची भूमिका साकारून आपल्या बॉलिवूडमधील कारकिदीर्ची सुरूवात केली

बॉलिवूडचा दिग्गज निर्माता व दिग्दर्शक करण जोहर सध्या जाम खूश आहे आणि का नसावा? जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात करणचा मेणाचा पुतळा जो उभारला गेलाय. होय, सिंगापूरच्या मादाम तुसाद संग्रहालयात करणचा मेणाचा पुतळा उभारण्यात आलाय. अलीकडे करणने या पुतळ्याचे अनावरण केले. याचबरोबर, करण जोहर या संग्रहालयात स्थान मिळवणारा बॉलिवूडचा पहिला दिग्दर्शक ठरला.
करणच्या मेणाचा पुतळा सेल्फी घेतानाच्या पोजमध्ये आहे.  या पुतळ्याचे अनावरण करताना करण कमालीचा भावूक झालेला दिसला. त्याची आई हिरू जोहर ही सुद्धा यावेळी हजर होती. आपल्या पुतळ्यासोबतचे अनेक फोटो करणने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हा माझ्यासाठी भावूक करणारा क्षण आहे. माझी मुले यश आणि रूही यांना मी हा पुतळा दाखवेल, तेव्हा त्यांच्यासाठीही हा भावूक क्षण असेल. मी ८ वर्षांचा होतो, तेव्हा वडिलांसोबत मादाम तुसाद संग्रहालयाला भेट दिली होती. याठिकाणी एकदिवस माझा मेणाचा पुतळा उभारला जावा, हे माझे स्वप्न होते, आज माझे ते स्वप्न पूर्ण झाले, असे करण यावेळी म्हणाला.


करण हा बॉलिवूडचा दिग्गज निर्माता व दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. करणने आदित्य चोप्राच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटामध्ये शाहरूख खानच्या मित्राची भूमिका साकारून आपल्या बॉलिवूडमधील कारकिदीर्ची सुरूवात केली. १९९८ साली त्याने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर करणने शाहरूख खानसह अनेक चित्रपट काढले जे सर्व सुपरहिट झाले. करण जोहर, शाहरूख खान व काजोल यांचे त्रिकूट बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस मानले जाते. चित्रपतसृष्टीसोबतच करणने छोट्या पडद्यावरही  त्याचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो कमालीचा लोकप्रिय आहे. अनेक शोमध्ये जज म्हणूनही तो दिसला.  

Web Title: Karan Johar unveils his wax statue at Madame Tussauds Singapore along with mom Hiroo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.