करण जोहरला एक दिवसासाठी जगायचंय या अभिनेत्रीचं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 14:10 IST2019-09-21T14:10:00+5:302019-09-21T14:10:00+5:30
एका मुलाखतीत करण जोहरनं सांगितलं की तो ट्रान्सफॉर्म झाला कोणाचं आयुष्य जगायला आवडेल

करण जोहरला एक दिवसासाठी जगायचंय या अभिनेत्रीचं आयुष्य
इंडिया टुडे कॉन्क्लेव २०१९मध्ये दिग्दर्शक करण जोहर, 'द ड्रीम मेकर करण जोहर ऑन रुलिंग बॉलिवूड' या सेशनमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने प्रोफेशनल व पर्सनल गोष्टींचा खुलासा केला. या व्यतिरिक्त त्याने रॅपिड फायर राउंडमध्येही भाग घेतला होता. या राउंडमध्ये त्याने कित्येक प्रश्नांची उत्तर दिली.
करण जोहर सिनेइंडस्ट्रीत बऱ्याच कालावधीपासून सक्रीय आहे. बॉलिवूडमध्ये त्याचे खूप सारे मित्र आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी रॅपिड फायर राउंड तितकं सोपे नव्हते. काही प्रश्नांची उत्तरे त्याने मजेशीर अंदाजात दिली. तर काही प्रश्नांमध्ये तो फसताना दिसला. त्यानं सांगितलं की, जर त्याने स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं तर त्याला कोणासारखं बनायला आवडेल.
मॉडरेटर सुशांत मेहताने करण जोहरला विचारलं की तुला कोणत्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफॉर्म व्हायला आवडेल. या प्रश्नाचं उत्तर देताना करण जोहरने हॉलिवूडची लिजेंड्री अॅक्ट्रेस मेरिल स्ट्रीपचं नाव घेतलं. तो म्हणाला की, असं तर कोणासारखं बनणं खूप कठीण आहे. मात्र जर मला संधी मिळाली तर मी एका दिवसासाठी मेरिल स्ट्रीपसारखे बनायला आवडेल. मला एक दिवसासाठी त्या बुद्धीमत्तेला जाणून घ्यायचं आहे. जर असं होत असेल तर निर्वानाच्या स्टेजपर्यंत पोहचू शकते. त्या खूप चांगली अभिनेत्री आहे.
मेरिल स्ट्रीप हॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. त्यांनी तीन अॅकडमी पुरस्कार व ८ गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्या आहेत.
करण जोहरने याशिवाय सांगितलं की शाहरूख खान, सलमान खान व आमीर खान यासारख्या कलाकारांपैकी कोणाला चांगला अभिनेता मानतो.करण थोडाही वेळ विचार न करता शाहरूख खानचं नाव घेतलं.
दुसऱ्या नंबरवर आमीर खान आणि तिसऱ्या नंबरवर सलमान खानचं नाव घेतलं. ही गोष्ट जगजाहीर आहे की बॉलिवूडमधील करण जोहर व शाहरूख खान ही यशस्वी जोडी आहे. हे दोन्ही कलाकार एकत्र कोणत्या सिनेमासाठी एकत्र येतात. तेव्हा तो चित्रपट एण्टरटेनिंग होतो.