करण जोहरच्या 'कॉफी विद करण'मध्ये 'या' दोन अभिनेत्री असणार पहिल्या गेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 10:07 IST2018-09-29T09:55:38+5:302018-09-29T10:07:20+5:30
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चॉट शो 'कॉफी विद करण'चा सहावा सीजन ऑक्टोबर महिन्याच्या 21 तारखेपासून सुरु होणार आहे. सहाव्या सीझनचे पहिले गेस्ट कोण असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

करण जोहरच्या 'कॉफी विद करण'मध्ये 'या' दोन अभिनेत्री असणार पहिल्या गेस्ट
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चॉट शो 'कॉफी विद करण'चा सहावा सीजन ऑक्टोबर महिन्याच्या 21 तारखेपासून सुरु होणार आहे. सहाव्या सीझनचे पहिले गेस्ट कोण असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सुरुवातीला अशी चर्चा रंगली होती की, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्या एपिसोडचे गेस्ट असू शकतात. मात्र शोच्या मेकर्सने या गोष्टींवरून अखेर पडद्या उचलला आहे.
पहिल्या एपिसोडमध्ये करणसोबत गप्प मारायला येणार आहेत, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट. करण जोहरने ट्विट केले आहे की, ''कॉफीचा पहिला कप गर्ल पावरसोबत. दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट तुमचे स्वागत आहे सहाव्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये.'' दीपिका पादुकोण सध्या तिच्या लग्नाला घेऊन चर्चेत आहे तर आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत सुरु असलेले अफेअरला घेऊन.
हा शो पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक मोठे कलाकार येऊन अनेक खुलासे करुन गेले आहेत. त्यामुळे या शोच्या प्रत्येक सीझनची प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असतात. मीडिया रिपोर्टनुसार शोची टीम विराट कोहली आणि अनुष्का शर्माला शोमध्ये घेऊन येण्यासाठी प्रयत्न करतायेत.
दीपिका आणि रणवीर सिंगच्या लग्नाबाबत बोलायचे झाले तर, दीपिकाने आपल्या लग्नामुळेचं ‘पद्मावत’नंतर कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही, अशीही खबर होती. केवळ इतकेच नाही लग्नाची खरेदीही सुरू झाल्याचा दावा अनेक मीडियाच्या बातम्यांमधून करण्यात आला होता. तर रणबीर सिंग नुकताच आपल्या वाढदिवस साजरा केला. रणबीरच्या बर्थ डे पार्टीत त्याचे जवळचे मित्र सहभागी होते.