नेपोटिझमचा बसलेला ठपका घालवण्यासाठी करण जोहरने आखला ‘मास्टरप्लान’,तरीही झाला ट्रोल, वाचा नेमके काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 02:34 PM2021-05-07T14:34:53+5:302021-05-07T14:38:44+5:30

कोरोनाकाळात सगळेच सेलिब्रेटी सद्या गरजुंना मदत करत आहेत.नुकतेच यशराज प्रोडक्शनने देखील सिने इंडस्ट्रीतील कामगारांचे लसीकरणाचा संपूर्ण खर्च उचलला आहे.

Karan Johar's Dharma Productions Joins Hands With Yuvaa to Help People During Pandemic | नेपोटिझमचा बसलेला ठपका घालवण्यासाठी करण जोहरने आखला ‘मास्टरप्लान’,तरीही झाला ट्रोल, वाचा नेमके काय घडले

नेपोटिझमचा बसलेला ठपका घालवण्यासाठी करण जोहरने आखला ‘मास्टरप्लान’,तरीही झाला ट्रोल, वाचा नेमके काय घडले

googlenewsNext

दिग्दर्शक करण जोहर या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. नुसता चर्चेतच असतो असे नाही तर त्यामुळे तो वादातही अडकतो. करण जोहरने आतापर्यंत अनेक स्टारकिड्सना लाँच केले आहे. अभिनेत्री आलिया भट्ट,  जान्हवी कपूर, वरुण धवन, अनन्या पांडे यांच्यासह अनेक स्टारकिड्स करणचे बोट पकडून या मनोरंजन विश्वात आले आहेत. यामुळे बहुतेक वेळेस करण वर नेपोटीझमचा प्रचार केल्याचा आरोप केला जातो.  

गेल्यावेळी चर्चेत होता कारण त्याने अभिनेता कार्तिक आर्यनला 'दोस्ताना २' सिनेमातून तडकाफडकी काढून टाकले. यामुळे सोशल मीडियावर करण जोहरवर नेटीझन्सने चांगलाच संताप व्यक्त केला. या एका मुद्द्यावरुन बघावे तेव्हा तेव्हा तो ट्रोल होत राहिला.इतकेच काय तर त्याच्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याचीही त्याला धमकी देण्यात आली. आता त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडचा डॅडी करण जोहर चर्चेत आला आहे. यावेळी त्याला लोकांच्या रोषाला सामोरे जायचे नाहीय. म्हणून त्याने एक वेगळीच आयडीया लढवली आहे. ज्या गोष्टीमुळे लोकांच्या त्याच्यावरील राग कमी होईल आणि थोडेफार प्रमाणात करणला सहानभुती मिळेल असे कदाचित त्याला वाटले असावे. मात्र त्याचा हा मास्टर प्लॅनही सुपर फ्लॉप ठरत आहे.


नुकताच त्याने एक फोटो शेअर केला आहे. हातात एक बोर्ड घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावर लिहीलंय की, I For India हे पाहून तर आणखी सोशल मीडियावर त्याला संतापाचा सामना करावा लागत आहे. त्याच्याबद्दल सहानभुती तर सोडाच तीव्र भाषेत लोकांच्या टीकेला त्याला समोरे जावे लागत आहे. कोरोनाकाळात सगळेच सेलिब्रेटी सद्या गरजुंना मदत करत आहेत. 

नुकतेच यशराज प्रोडक्शनने देखील सिने इंडस्ट्रीतील कामगारांचे लसीकरणाचा संपूर्ण खर्च उचलला आहे. अशात करण जोहर कसा पाठी राहणार, करणच्या धर्मा प्रोडक्शननेही देखील कोरोना काळात मदतीचा हात पुढे केला आहे. धर्मा प्रोडक्शन देखील यशराजप्राणेच मदत करणार आहे. सोशल मीडियावर धर्मा प्रोडक्शन लसीकरणाबाबतची संपूर्ण माहिती आणि मानसिक आरोग्य या बाबतीच लोकांची मदत करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. टीम युवा आणि धर्मा नेहमीच निस्वार्थ लोकांची सेवा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  

Web Title: Karan Johar's Dharma Productions Joins Hands With Yuvaa to Help People During Pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.