करण जोहरचा खुमासदार अंदाज 'केस तो बनता है'मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 20:52 IST2022-09-07T20:51:54+5:302022-09-07T20:52:27+5:30
Case To Banata Hai: केस तो बनता है हा एक साप्ताहिक विनोदी कार्यक्रम असून त्यात बचाव करणाऱ्या वकिलाच्या भूमिकेत वरुण शर्मा आहे, तर रितेश देशमुख सरकारी वकील झाला आहे.

करण जोहरचा खुमासदार अंदाज 'केस तो बनता है'मध्ये
सिनेनिर्माता करण जोहर याचा कॉमेडी कार्यक्रम ‘केस तो बनता है’च्या कोर्टरूममध्ये दाखल होताच भरपूर मजामस्ती, हास्यविनोद आणि मनोरंजनाच्या हाय डोसचा अनुभव आला. अॅमेझॉन मिनी टीव्ही – अॅमेझॉन मोफत व्हीडिओ स्ट्रीमिंग सेवा मंचावरील आरोपीच्या पिंजऱ्यात केजो’च्या एंट्रीचा विनोदी व्हिडिओ तयार करण्यात आला. विनोदवीर परितोष त्रिपाठी यांच्या सुंदर पंचलाईन्स आणि करण जोहरचा खुमासदार वावर यामुळे पोट दुखेपर्यंत मनोरंजन झाले.
आपल्या मस्तमौला शैलीत बोलताना करण म्हणाला, “स्टार जब पैदा होता है, तो पैदा होते ही पहले ‘मां’ नही, ‘धर्मा’ बोलता है.” करणचा स्वत:चा असा एक अंदाज आणि स्टाईल आहे, आपल्या अतरंगी आरोपांचे खंडन तितक्याच मनोरंजक पद्धतीने करण्यासाठी करण सज्ज आहे.
केस तो बनता है हा एक साप्ताहिक विनोदी कार्यक्रम असून त्यात बचाव करणाऱ्या वकिलाच्या भूमिकेत वरुण शर्मा आहे, तर रितेश देशमुख सरकारी वकील झाला आहे. सोशल मीडियावरील लक्षवेधी कुश कपिला न्यायमूर्तीच्या वेशात चोख भूमिका बजावताना दिसेल. त्याच्या हातात काही बॉलिवूड सेलेब्रिटीजच्या नशिबाची दोरी आहे, तर विनोदवीर परितोष त्रिपाठी, गोपाळ दत्त, संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा आपल्या अनोख्या विनोदाने मनोरंजन करतील. ही सगळी मजा अगदी मोफत येत्या शुक्रवारी, ९ सप्टेंबर रोजी अॅमेझॉन शॉपिंग अॅपच्या अॅमेझॉन मिनी टीव्हीवर अनुभवायला मिळेल.