रंगोली चंडेलने घेतली करण जोहरची ‘शाळा’; केले खरमरीत ट्विट!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:20 PM2020-02-23T18:20:03+5:302020-02-23T18:20:46+5:30
कंगना राणौतच्या अगोदर ती टिवटरच्या माध्यमातून एखाद्या सेलिब्रिटीला सुनावते. त्यात करण जोहर आणि हृतिक रोशन यांच्यावर ती नेहमीच आगपाखड करते.
असा एकही मुद्दा नाही, ज्यावर कंगना राणौतची बहीण रंगोली चंडेल काही बोलली नाही. होय, हे खरे आहे. कंगना राणौतच्या अगोदर ती टिवटरच्या माध्यमातून एखाद्या सेलिब्रिटीला सुनावते. त्यात करण जोहर आणि हृतिक रोशन यांच्यावर ती नेहमीच आगपाखड करते. आता ती पुन्हा एकदा दिग्दर्शक करण जोहरवर भडकली आहे. कारण काय? जाणून घ्यायचेय? तर मग वाचा...
तुम्हाला तर माहिती आहे की, दिग्दर्शक करण जोहर सध्या ‘तख्त’ चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त आहे. प्रेक्षकांनाही त्याच्या या चित्रपटाची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. या चित्रपटाचे लेखन हुसैन हैदरी करत आहेत. त्यांनी कायमच ‘नागरिकता विधेयक’ विरूद्ध त्यांची मते मांडली आहेत. त्यांनी याविषयी ट्विट देखील केले होते. त्यांनी केलेले हे ट्विट बरंच चर्चेत होते. त्यांनी या ट्विटमध्ये हिंदु आतंकवादच्या बाबत वक्तव्य केले होते. या ट्विटच्या आधाराने तिने करण जोहरची चांगलीच खरडपट्टी केली आहे. तिने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,‘ पप्पा जोहर, हे काय सुरू आहे? तुम्ही देशात इस्लामची पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहात का? अॅक्टिंगचे समीकरण तर ऐकले होते पण, दिग्दर्शनाचे समीकरण पहिल्यांदाच ऐकले.’ आता यावर करण जोहर काय उत्तर देणार हे पाहण्याची उत्सुकता आहे.
Papa jo Yeh kya ho raha hai bhai, Aap Islam envision pe film bana rahe ho ya phir desh mein Islam envision laane ki koshish kar rahe ho, method acting toh suna tha method direction 😂😂😂hahahahahaha https://t.co/O7G7iN9nRH
— Rangoli Chandel (@Rangoli_A) February 22, 2020
रंगोलीने करण जोहरविरोधात असे ट्विट करने हे काही पहिल्यांदाच होत नाहीये. तर यापूर्वीही तिने अनेकदा करण जोहरबद्दल असे टिवट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून करण जोहरवर असा आरोप होत आहे की,‘तो या चित्रपटांच्या साह्याने इस्लामला प्रोत्साहन देत आहे.’ पूर्वी ‘माय नेम इज खान’ चित्रपटावेळी त्याने स्पष्टीकरण दिले होते. त्याने टिवट केले होते की,‘ मी सर्वधर्मसमभाव मानणारा दिग्दर्शक आहे. ‘तख्त’ची कहाणी मी लिहिलेली नाही, तो फक्त एक इतिहास आहे, जो मी तुमच्यापुढे ठेवतो आहे.’