करण जोहर घेऊन येतोय 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', रणवीर सिंग आणि आलिया भट मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 12:49 PM2021-07-06T12:49:41+5:302021-07-06T12:50:12+5:30

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर तब्बल ५ वर्षानंतर दिग्दर्शनात कमबॅक करतो आहे.

Karan Johar's upcoming movie 'Rocky and Rani Ki Prem Kahani', Ranveer Singh and Alia Bhatt in lead roles | करण जोहर घेऊन येतोय 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', रणवीर सिंग आणि आलिया भट मुख्य भूमिकेत

करण जोहर घेऊन येतोय 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', रणवीर सिंग आणि आलिया भट मुख्य भूमिकेत

googlenewsNext

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर तब्बल ५ वर्षानंतर दिग्दर्शनात कमबॅक करतो आहे. दिग्दर्शक म्हणून करण जोहरने आगामी सिनेमाची अधिकृत घोषणा केली आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे रॉकी और रानी की प्रेम कहानी. या चित्रपटात आलिया भट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा २०२२ ला रिलीज होणार आहे. 

करण जोहरने सोशल मीडियावर आगामी चित्रपटाची घोषणा करत लिहिले की, माझ्या आवडत्या लोकांना समोर ठेवून कॅमेऱ्याच्या मागे जाऊन काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

यापूर्वी करण जोहरने ५ जुलैला त्याने बनवलेल्या चित्रपटांच्या क्लिप्सचा व्हिडीओ शेअर करत त्याच्या दिग्दर्शनाचा प्रवास रेखाटला होता. त्याने म्हटले होते की, ५ वर्षानंतर दिग्दर्शनात कमबॅक करतो आहे. त्याने लिहिले होते की, ही नवीन प्रवासाची सुरूवात आहे, आता माझ्या आवडत्या जागी परतण्याची वेळ आली आहे.आता कॅमेऱ्याच्या मागे जाऊन काही अविस्मरणीय लव्ह स्टोरीज क्रिएट करण्याची वेळ आली आहे. ही कथा असणार आहे प्रेम आणि कुटुंबात रुळलेली.


करण जोहर दिग्दर्शित, हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्व मेहता द्वारा निर्मित , या चित्रपटाचा स्टुडिओ पार्टनर व्हायकॉम १८ आहे. या चित्रपटाचे संवाद इशिता मोइत्रा यांचे असून , कथा  इशिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिलेली आहे.  हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Karan Johar's upcoming movie 'Rocky and Rani Ki Prem Kahani', Ranveer Singh and Alia Bhatt in lead roles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.