'मी मुलींना रंगावरुन चिडवायचो'; करण कुंद्राला आता होतोय त्या गोष्टीचा पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 13:22 IST2024-03-12T13:21:00+5:302024-03-12T13:22:51+5:30
Karan kundrra: अलिकडेच करणने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या शालेय जीवनातील काही आठवणींना उजाळा दिला आहे.

'मी मुलींना रंगावरुन चिडवायचो'; करण कुंद्राला आता होतोय त्या गोष्टीचा पश्चाताप
'बिग बॉस' फेम (bigg boss) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता करण कुंद्रा सध्या त्याच्या तेरा क्या होगा लवली या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यात अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. इतकंच नाही तर त्याने त्याची सेलिब्रिटी क्रश, लहानपणी मुलींना दिलेला त्रास या सगळ्यावर भाष्य केलं.
अलिकडेच करणने 'दैनिक भास्कर'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या शालेय जीवनातील अनेक आठवणी सांगितल्या. "लहानपणी मी मुलींना त्यांच्या रंगावरुन चिडवायचो. काळी, वांगी असं काहीही बोलायचो. हे वागणं म्हणजे खरोखर अपमानास्पद होतं. पण, त्यावेळी मला या गोष्टीची जाणीव नव्हती की मी चुकीचं वागतोय. आता मोठा झाल्यावर या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत हे कळतंय. मी किती मुर्खासारखं वागलोय, किती चुका केल्या ते समजतंय", असं करण म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "हा सिनेमा करुन मला खरंच खूप समाधान मिळतंय. मला असा एक प्रोजेक्ट करायचा होता. ज्यात मला समाजाला आरसा दाखवता येईल. आपल्या देशात सावळा रंग एखादा कलंक असल्यासारखाचं मानलं जातं. पण, काही लोक असेही आहेत ज्यांना रंगामुळे काहीह फरक पडत नाही. मात्र, हेच लोक सोशल मीडियावर फिल्डरशिवाय त्यांचा फोटो अपलोड करत नाहीत. या सिनेमात याच सेंसेटिव्ह विषयावर भाष्य केलं आहे."