करण म्हणतो, मी ‘गे’ आहे!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2017 03:53 PM2017-01-08T15:53:52+5:302017-01-09T11:18:32+5:30
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर यानेही त्याच्याबद्धल चर्चेत असलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. करण जोहर ‘गे’ ...
ब लिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर यानेही त्याच्याबद्धल चर्चेत असलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. करण जोहर ‘गे’ असल्याबद्धल मवाळ चर्चा होते. मात्र, करणने पहिल्यांदाच त्याबाबत जाहीर भाष्य केले आहे. करण जोहरचे आत्मचरित्र ‘द अनस्युटेबल बॉय’यामधून त्याने अनेक खुलासे केले आहेत. त्याचा सेक्सशी केव्हा संबंध आला याबाबतही त्याने लिहिले आहे. ‘मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. माझा जन्म सेक्स आयुष्यावर चर्चा करण्यासाठी झाला नाही’ असेही सडेतोड उत्तर त्याने दिले आहे.
आपल्या आत्मचरित्रात करण जोहर लिहितो, अनेक लोक माझ्या सेक्स लाईफबद्धल माहिती मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण, याविषयी मला काही ओरडून सांगणे गरजेचे नाही. मी अशा देशात राहतो, जेथे मी काही गोष्टी सांगितल्यास मला तुरुंगात जावे लागू शकते. मी २६ वर्षांचा असताना व्हर्जिनिटी गमाविली. हे सांगताना मला अभिमान वाटत नाही. मी तेव्हा न्यूयॉर्कमध्ये होतो, माझा तो पहिला अनुभव होता.
करण लिहितो की, लहान असताना आपल्याला बºयाच गोष्टी माहिती नसतात, माझ्या वर्गातल्या एका मुलाने एकदा मला ‘तुला ब्लो जॉब माहिती आहे का?’ असा प्रश्न विचारला. मी नाही असे उत्तर दिले. मला ते काय असते हे माहित नव्हतेच. त्याने माझे कपडे काढण्यास सांगून पंख्याचा स्पीड वाढवला, यालाच ब्लो जॉब म्हणतात, असे तो म्हणाला. त्यानंतर मी असे तीनदा केलं. मात्र, मोठा झाल्यावर सेक्समध्ये फार काही अवघड नसल्याचे मला लक्षात आले.
याशिवाय त्याने आपल्या खास मित्र म्हणविणाºया शाहरुख खानचा उल्लेख केला. करण जोहर याने आत्मचरित्रात लिहिले, ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी प्रसिद्धीच्या झोतात आलो, तेव्हा खºया अर्थाने मला सेक्स असते हे कळायला लागले. माझ्याबद्धल अनेक लोक विशेषत: सेक्सबाबत अनेक अफवा पसरवितात. त्या माझ्या कानावरही आल्या आहेत. काहींनी तर शाहरूख खानसोबत माझे नाव जोडले. शाहरुख हा माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहे. त्या काळात आम्ही दोघांनी कोणत्या अडचणींचा सामना केला हे आम्हीच जाणतो. मी होमोसेक्श्युअल, बायोसेक्सश्युल असलो तरी तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. माझा जन्म सेक्स आयुष्यावर चर्चा करण्यासाठी झाला नाही, असेही त्याने लिहिले.