अवघ्या ३ महिन्यांच्या देवीच्या हृदयात २ छिद्र असल्याचं कळलं अन्...; लेकीबद्दल बोलताना करण सिंह ग्रोव्हर भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 12:22 PM2024-08-16T12:22:53+5:302024-08-16T12:24:42+5:30

वयाच्या चाळीशीत बिपाशाने लेक देवी हिला जन्म दिला. पण, जन्मानंतर बिपाशाच्या लेकीच्या हृदयाला दोन छिद्र असल्याचं समजलं होतं. या कठीण काळाबद्दल नुकतंच दिलेल्या मुलाखतीत करण सिंग ग्रोव्हरने भाष्य केलं. 

karan singh grover talk about emotional phase bipasha basu and his daughter devi heart surgery | अवघ्या ३ महिन्यांच्या देवीच्या हृदयात २ छिद्र असल्याचं कळलं अन्...; लेकीबद्दल बोलताना करण सिंह ग्रोव्हर भावुक

अवघ्या ३ महिन्यांच्या देवीच्या हृदयात २ छिद्र असल्याचं कळलं अन्...; लेकीबद्दल बोलताना करण सिंह ग्रोव्हर भावुक

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. २०१६मध्ये बिपाशा आणि करणने लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर ६ वर्षांनी बिपाशा आणि करण आईबाबा झाले. वयाच्या चाळीशीत बिपाशाने लेक देवी हिला जन्म दिला. पण, जन्मानंतर बिपाशाच्या लेकीच्या हृदयाला दोन छिद्र असल्याचं समजलं होतं. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या देवीच्या हृदयावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. या कठीण काळाबद्दल नुकतंच दिलेल्या मुलाखतीत करण सिंग ग्रोव्हरने भाष्य केलं. 

करणने नुकतीच दैनिक भास्करला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आयुष्यातील खडतर प्रसंगांबद्दल सांगितलं. करण म्हणाला, "माझ्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. पण, काही चुकीचं घडलं नाही. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. पण, जेव्हा ३ महिन्यांच्या माझ्या लेकीच्या हृदयाला छिद्र असल्याचं समजलं. तो सगळ्यात कठीण प्रसंग होता. बिपाशा आणि माझ्यासाठी तो काळ सगळ्यात कठीण काळ होता". 


"एवढ्याशा वयात तिने जे काही सहन केलंय, ते शब्दांत सांगता येणार नाही. माझ्या मुलीच्या छातीपासून ते पोटापर्यंत एक निशाण आहे. माझी पत्नी बिपाशा आणि लेक देवीने खूप गोष्टींचा सामना केला आहे", असंही पुढे करणने सांगितलं. करण सिंग ग्रोव्हर अलिकडेच प्रदर्शित झालेल्या फायटर सिनेमात दिसला होता. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच त्याच्या मुलीच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  

बिपाशा आणि करणने आपल्या लेकीचं नाव देवी असं ठेवलं आहे. त्यांची लेक आता १ वर्ष ९ महिन्यांची आहे. अनेकदा बिपाशा लेकीबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. करणशी लग्न केल्यानंतर बिपाशा फारशी कुठे दिसली नाही. २०१८ पासून तिने सिनेसृष्टीपासून दूर राहणं पसंत केलं आहे. सध्या ती तिचं मदरहूड एन्जॉय करत आहे. 

Web Title: karan singh grover talk about emotional phase bipasha basu and his daughter devi heart surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.