करण वाही ‘लंडन गर्ल’च्या प्रेमात, ‘खुल्लमखुल्ला’ दिली प्रेमाची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 03:41 PM2020-01-09T15:41:17+5:302020-01-09T15:41:47+5:30
होय, करण वाही सध्या लंडनमध्ये राहणा-या एका मुलीला डेट करतोय.
करण वाहीने 2004 मध्ये टीव्हीवर पदार्पण केले आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले. त्याच्या लोकप्रियतेचा आलेख सतत चढताच राहिला. आपली अभिनयाची कारकीर्द सांभाळतानाच करणने अनेक पुरस्कार सोहळे आणि रिअॅलिटी कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. कालांतराने बॉलिवूडमध्ये हिरोही झाला. शानदार अॅक्टिंग आणि तितकीच शानदार पॅर्सनॅलिटीमुळे करणचे फिमेल फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. पण आता करणच्या फिमेल फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. करणला त्याचे प्रेम मिळालेय.
होय, करण वाही सध्या लंडनमध्ये राहणा-या एका मुलीला डेट करतोय. करणच्या या गर्लफ्रेन्डचे नाव आहे उदिती सिंग. खुद्द करणने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा खुलासा करत, आपले नाते जगजाहिर केले आहे.
करणने उदितीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. उदितीचा ग्लॅमर इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. दोघेही गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि आता हे नाते बरेच पुढे गेले आहे.
नुकतेच करण व उदिती दोघेही लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसले होते. यापूर्वी करण वाही मॉडेल जिनिता सेठसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर अचानक दोघांचे ब्रेकअप झाले होते. यानंतर करणच्या आयुष्यात उदितीची एन्ट्री झाली.
करण वाहीने रिमिक्स या मालिकेद्वारे त्याच्या करियरला सुरुवात केली. या मालिकेत त्याने साकारलेली रणवीरची भूमिका चांगलीच गाजली होती. या मालिकेमुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
त्यानंतर मेरे घर आई एक नन्ही परी, दिल मिल गये यांसारख्या मालिकांमध्ये करणने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. याप्रमाणेच कुछ तो लोग कहेंगे, दिल दोस्ती दिवानेपन की यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला. २०१४ मध्ये तो मोठ्या पडद्याकडे वळला. दावत ए इश्क आणि हेट स्टोरी 4 या सिनेमात त्याला संधी मिळाली.