मेघना गुलजारच्या 'दायरा' चित्रपटात झळकणार करीना कपूर-आयुषमान खुराना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 19:53 IST2024-06-18T19:52:53+5:302024-06-18T19:53:23+5:30
Daira Movie : मेघना गुलजार या वर्षाच्या अखेरीस 'दायरा' चित्रपटाचे शूटिंग सुरू करू शकते. चित्रपटातील इतर पात्रांसाठीही कास्टिंग सुरू असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकतो.

मेघना गुलजारच्या 'दायरा' चित्रपटात झळकणार करीना कपूर-आयुषमान खुराना
दिग्दर्शिका मेघना गुलजार(Meghana Gulzar)चा बॉलिवूडच्या टॉप फिल्ममेकर्सच्या यादीत समावेश आहे. विकी कौशलसोबत 'सॅम बहादूर' बनवल्यानंतर मेघना गुलजार तिच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. ती 'दायरा' (Diara Movie) नावाचा चित्रपट बनवत आहे, ज्यासाठी तिने मुख्य कलाकारांची कास्टिंग जवळपास निश्चित केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात करीना कपूर (Kareena Kapoor) आणि आयुषमान खुराना (Aayushman Khurana) दिसणार आहेत.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, मेघना गुलजार तिच्या चित्रपटासाठी करीना कपूर आणि आयुषमान खुराना यांच्याशी चर्चा करत आहे. दोन्ही स्टार्सने चित्रपटात काम करण्यास होकार दिला असून येत्या काही दिवसांत पेपरवर्कही पूर्ण केली जातील, असेही सांगण्यात येत आहे. मेघना गुलजार या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू करू शकते. चित्रपटातील इतर पात्रांसाठीही कास्टिंग सुरू असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकतो.
काय आहे चित्रपटाची कथा?
मीडिया रिपोर्टनुसार, मेघना गुलजारच्या चित्रपटाची कथा २०१९च्या हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून प्रेरित असेल. नोव्हेंबर २०१९ मध्ये, हैदराबादजवळील शमशाबादमध्ये २६ वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. नंतर त्याला हैदराबाद पोलिसांनी घटनास्थळाजवळ नेत असताना गोळ्या घातल्या. २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याला बनावट चकमक म्हटले होते.
करीना-आयुषमान पहिल्यांदाच झळकणार एकत्र
आयुषमान खुराना आणि करीना कपूर पहिल्यांदाच एकत्र काम करणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर मेघना गुलजारचा करीना आणि आयुषमानसोबतचा हा पहिलाच चित्रपट असेल.