करीना कपूर करणार सोनी बीबीसी अर्थचे प्रतिनिधित्व

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2017 01:12 PM2017-02-26T13:12:27+5:302017-02-26T18:42:54+5:30

बॉलिवुडची तगडी अभिनेत्री करिना कपूर ही गेली वर्षभर चर्चेत होती. आता ती पुन्हा तिचे करिअर करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

Kareena Kapoor to be representing Sony BBC World | करीना कपूर करणार सोनी बीबीसी अर्थचे प्रतिनिधित्व

करीना कपूर करणार सोनी बीबीसी अर्थचे प्रतिनिधित्व

googlenewsNext
लिवुडची तगडी अभिनेत्री करिना कपूर ही गेली वर्षभर चर्चेत होती. आता ती पुन्हा तिचे करिअर करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्याचबरोबर ती तिच्या कामाच्या सुरूवातदेखील ब्रँड अ‍ॅम्बेसेडरने करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. हो, खरचं करिना कपूर आता सोनी बीबीसी अर्थ या वाहिनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून  प्रेक्षकांसमोर येणार आहे. करीनाच्या खळखळत्या उत्साहाला लक्षात घेऊन वाहिनीने फील अलाईव्ह या घोषवाक्यांतर्गत तिची प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. करीना गर्भवती असतानाच तिने या वाहिनीच्या प्रसिद्धीसाठी खास व्हिडीओचे चित्रीकरण केले होते. या व्हिडीओची पहिली झलक प्रकाशित करण्यात आली असून यातली करीना पाहिल्यानंतर गल्लिव्हरच्या गोष्टीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
     
          सोनी बीबीसी अर्थ ही वाहिनी पाहणे प्रेक्षकांसाठी सुखद अनुभव ठरणार आहे. नवीन संकल्पनेवरच्या या वाहिनीसाठी करीनाची निवड करताना तिच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा आम्ही पहिल्यांदा विचार केला, असे या वाहिनीच्या सूत्रांनी सांगितले. करीनाचे चैतन्य, तिला निसर्गाबद्दल असलेलं प्रेम, तिचा जात्याच असलेला उत्साह, सतत आनंदी राहणं या तिच्या व्यक्तिमत्त्वाचा फार मोठा प्रभाव जनमानसावर आहे. त्यामुळे सोनी बीबीसी अर्थसाठी प्रतिनिधी म्हणून तिची निवड योग्य ठरते, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
 
         सोनम कपूरची निर्मिती असलेल्या वीरे दी वेडिंग हा करीनाचा नवीन चित्रपट असणार आहे. याही चित्रपटाचे चित्रीकरण तिने गर्भवती असतानाच पूर्ण केले होते. तिच्याबरोबर सोनम कपूर आणि स्वरा भास्कर या अभिनेत्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खूपच खास असणार आहे. मात्र या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. 

Web Title: Kareena Kapoor to be representing Sony BBC World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.