बिपाशा-करिनाचा आहे ३६चा आकडा, एकमेकांचा चेहराही बघायला तयार नव्हत्या अभिनेत्री,1 छोट्याशा गोष्टीमुळे झाला होता वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 08:09 AM2023-06-14T08:09:00+5:302023-06-14T08:10:01+5:30

करिनाने बिपाशाच्या जोरदार कानशिलात लगावली. दोघींचा वाद सोडविण्यासाठी जेव्हा अभिनेता बॉबी देओलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा करिना  बॉबीवरही भडकली होती.

kareena kapoor bipasha basu had major fight during film ajnabee shooting in 2001 over trivial reason know interesting story | बिपाशा-करिनाचा आहे ३६चा आकडा, एकमेकांचा चेहराही बघायला तयार नव्हत्या अभिनेत्री,1 छोट्याशा गोष्टीमुळे झाला होता वाद

बिपाशा-करिनाचा आहे ३६चा आकडा, एकमेकांचा चेहराही बघायला तयार नव्हत्या अभिनेत्री,1 छोट्याशा गोष्टीमुळे झाला होता वाद

googlenewsNext

९० च्या दशकात बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये कॅट-फाइट होणे खूप सामान्य होते. जेव्हा निर्माते एका चित्रपटात एकापेक्षा जास्त अभिनेत्रींना कास्ट करायचे तेव्हा त्यांना अनेकदा अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले. कधी स्क्रिनच्या वेळेबद्दल, कधी भूमिकेवरून तर कधी अभिनेत्याबद्दल अभिनेत्रींमध्ये मतभेद असायचे. कधी-कधी हे मतभेद इतके टोकाला जायचं की सार्वजनिक ठिकाणीही या अभिनेत्री एकमेकांवर भाष्य करायला मागेपुढे पहायचा नाही. कधी-कधी तर प्रकरण इतकं वाढायचे की मारामारी व्हायची.

इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्यातील भांडणं जगजाहिर आहेत. मग ती रवीना टंडन-करिश्मा कपूर असो की राणी मुखर्जी-ऐश्वर्या राय. पण आज आम्ही तुम्हाला बिपाशा बसू आणि करीना कपूर यांच्यातील भांडणाबद्दल   सांगणार आहोत. बिपाशाने 2001 मध्ये ‘अजनबी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमात बिपाशासह करिना कपूर लीड रोलमध्ये होती. पण या पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर बिपाशाला करिनाचा मार खावा लागला होता. आजही हा किस्सा बॉलिवूडमध्ये सांगितला जातो.

होय,  चित्रपटात करिना आणि बिपाशा बासू या दोघींच्याही प्रमुख भूमिका होत्या. मात्र करिनाच्या तुलनेत बिपाशाला अधिक प्रसिद्धी मिळत गेली. चित्रपटात बिपाशाने जोरदार अंगप्रदर्शन केल्याने तिची चर्चा होती. नेमकी हीच बाब करिनाला खटकली.  टीव्ही, वृत्तपत्र, साप्ताहिक सगळीकडेच बिपाशाचा डंका वाजत होता. मात्र बिपाशाची ही प्रसिद्धी करिनाला पचविणे अवघड झाले होते. मग काय, बिपाशाला टोमणा मारण्याची एकही संधी करिना सोडत नव्हती. 

अशात करिनाचा डिझायनर विक्रम फडणीसने बिपाशाची मदत केली. मग काय करिनाचा पारा आणखीच भडकला.
एक दिवस बिपाशानेही करिनाला जशास तसे उत्तर देण्याचे ठरविले. तसे तिने धाडसही केले. परंतु यावेळेस करिनाच बिपाशावर भारी पडली. करिनाने बिपाशाच्या जोरदार कानशिलात लगावली. दोघींचा वाद सोडविण्यासाठी जेव्हा अभिनेता बॉबी देओलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा करिना  बॉबीवरही भडकली होती.  त्यालाही तिने सुनावले. 

बिपाशा एका मुलाखतीत यावर बोलली होती. करिनाचे वागणे बालिश होते. मी पुन्हा कधीही तिच्यासोबत काम करणार नाही, असे बिपाशा म्हणाली होती. यानंतर करिनानेही यावर बोलली होती. माझ्या मते, बिपाशाला तिच्या टॅलेंटवर अजिबात विश्वास नाही. चार पानांच्या मुलाखतीत तीन पेज ती फक्त माझ्यावर बोलली. बिपाशाला जी काही प्रसिद्धी मिळाली ती तिच्या व माझ्या भांडणामुळे मिळाली, असे करिना म्हणाली होती.
 

Web Title: kareena kapoor bipasha basu had major fight during film ajnabee shooting in 2001 over trivial reason know interesting story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.