प्रेग्नेंसीनंतर करिना कपूर करणार टीव्ही डेब्यू?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2017 03:34 PM2017-02-08T15:34:17+5:302017-02-08T21:04:17+5:30

तैमुरच्या जन्मानंतर करिना कपूर आता पुन्हा तिच्या करिअरकडे लक्ष केंद्रित करताना दिसून येत आहे. नुकताच तिने रॅम्प वॉक करून ...

Kareena Kapoor to debut TV debut after pregnancy? | प्रेग्नेंसीनंतर करिना कपूर करणार टीव्ही डेब्यू?

प्रेग्नेंसीनंतर करिना कपूर करणार टीव्ही डेब्यू?

googlenewsNext
मुरच्या जन्मानंतर करिना कपूर आता पुन्हा तिच्या करिअरकडे लक्ष केंद्रित करताना दिसून येत आहे. नुकताच तिने रॅम्प वॉक करून आपण करिअरबाबत सजग असल्याचे दाखवूनही दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करिनाला टीव्हीसाठी आॅफर आली असून, त्यात डेब्यू करण्याचा सध्या ती प्लॅन करीत आहे. 

वास्तविक करिना ग्लोबल इन्फोटेन्मेंट चॅनल ‘टीएलसी’ची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे. हे चॅनल लवकरच भारतात लॉँच होण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार करिना या चॅनलसोबत टीव्ही डेब्यू करण्याची शक्यता आहे. प्रेग्नेंसीच्या दरम्यान हे चॅनल करिनासोबत अप्रोच झाले असल्याची माहितीही समोर येत आहे. विशेष म्हणजे करिनाने त्यास दुजोरा दिला असल्याने ती लवकरच छोट्या पडद्यावर झळकू शकते. 



वेल नॉन असलेल्या या चॅनलने प्र्रेग्नेंसीदरम्यानच करिनाला ही आॅफर दिली होती. मात्र तेव्हा करिनाने स्पष्ट शब्दात नकार दिला होता. मात्र आता येत असलेल्या वृत्तानुसार करिना या चॅनेलच्या प्रोजेक्टवर विचार करीत आहे. करिना यूके मध्ये जबरदस्त पॉप्युलर असल्यानेच हे चॅनेल करिनाला वारंवार अ‍ॅप्रोच होत असल्याचेही समजते. या अगोदर करिना तिचा क्लोज फ्रेंड सलमान खान आणि करण जोहर याच्याबरोबर टीव्हीवर झळकलेली आहे. 

सध्या करिना ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, बºयाचशा अ‍ॅडसाठीही ती काम करीत आहे. अशात करिना या चॅनलच्या आॅफरचा खरोखरच स्वीकार करेल का? याविषयी मात्र सस्पेंस आहे. मात्र करिनाकडून सध्या या प्रोजेक्टवर काम केले जात असल्याची माहिती समोर येत असल्याने तिच्या फॅन्सना आता छोट्या पडद्यावरही तिचे जलवे बघण्यास मिळू शकतात. 

Web Title: Kareena Kapoor to debut TV debut after pregnancy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.