प्रेग्नेंन्सीचे शेवटचे आठवडे एन्जॉय करतेय करिना कपूर, शेअर केला हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 17:13 IST2021-02-04T17:13:00+5:302021-02-04T17:13:00+5:30
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर दुसऱ्यांदा आई बनणार आहे आणि सध्या ती तिची प्रेग्नेंसी खूप एन्जॉय करते आहे.

प्रेग्नेंन्सीचे शेवटचे आठवडे एन्जॉय करतेय करिना कपूर, शेअर केला हा व्हिडीओ
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर दुसऱ्यांदा आई बनणार आहे आणि सध्या ती तिची प्रेग्नेंसी खूप एन्जॉय करते आहे. ती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तिचे बेबी बंपसोबतचे फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती देखील मिळताना दिसते. नुकतेच करीना कपूरने इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात ती खूप सुंदर दिसते आहे.
करीना कपूरने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, नववा महिना आणि स्ट्राँग बनते. या व्हिडीओत करीना स्माइल करत बेबी बंपकडे बघताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओवर सेलिब्रेटींसोबत तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
काही दिवसांपूर्वी करीना कपूरने इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केला आहे ज्यात ती स्टायलिश अंदाजात योग करताना दिसते आहे. यासोबतच तिने चाहत्यांना सल्ला दिला आहे की, जर थोडीसी शांतता हवी तर थोडा योग गरजेचा आहे. प्रेग्नेंसी दरम्यान करीना स्वतःला फिट आणि ग्लॅमरस ठेवते. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत येत असते.
करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती अंग्रेजी मीडियम चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत इरफान खान मुख्य भूमिकेत होता. या सिनेमात करीना पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत होती.
या चित्रपटाआधी करीना गुड न्यूज सिनेमात दिसली होती. यात तिच्यासोबत दलजित दोसांझ, अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसले होते. लवकरच ती लाल सिंग चड्ढा चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.