‘वीरे दी वेडींग’ हिट होताच करिना कपूर झाली ‘महाग’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 08:32 PM2018-08-09T20:32:17+5:302018-08-09T21:19:11+5:30

लग्नानंतर अभिनेत्रींचे करिअर संपल्याचा काळ आता इतिहास जमा झालाय. होय, आता लग्नचं काय, पण मुलं झाल्यानंतरही अभिनेत्रींचे स्टारडम जराही कमी होत नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, बेबो करिना कपूर. 

kareena kapoor hiked her fees after veere di wedding success | ‘वीरे दी वेडींग’ हिट होताच करिना कपूर झाली ‘महाग’!!

‘वीरे दी वेडींग’ हिट होताच करिना कपूर झाली ‘महाग’!!

googlenewsNext

लग्नानंतर अभिनेत्रींचे करिअर संपल्याचा काळ आता इतिहास जमा झालाय. होय, आता लग्नचं काय, पण मुलं झाल्यानंतरही अभिनेत्रींचे स्टारडम जराही कमी होत नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, बेबो करिना कपूर. होय, एका मुलाची आई झाल्यानंतर करिनाने ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून दमदार कमबॅक केले आणि आई झाले असले तरी काहीच बदललेले नाही, हे आपल्या अदाकारीने तिने दाखवून दिले. हेच कारण आहे की, करिनाकडे आजही मोठ मोठ्या प्रोजेक्टच्या आॅफर्स येत आहेत. यातील करण जोहरच्या ‘गुड न्यूज’ आणि ‘तख्त’ हे दोन सिनेमे तिने साईनही केले आहेत. लवकरच करिना आणखी काही बिग बॅनरचे चित्रपट साईन करणार आहे. पण खबर केवळ इतकीच नाही, तर खरी बातमी यापुढे आहे. होय, ‘वीरे दी वेडींग’ हिट झाल्यानंतर करिनाने आपली फी वाढवल्याचे कळतेय.

 मिड डेच्या वृत्तनुसार, ‘वीरे दी वेडींग’मध्ये करिनाशिवाय सोनम कपूर, स्वरा भास्कर, शिखा तलसानिया यांच्याही भूमिका होत्या. म्हणजेच, हा चित्रपट केवळ करिना आणि करिनामुळे हिट झाला असे म्हणता येणार नाही. पण तरिही, रिलीजवेळी करिनाच्या स्टारडमचा मोठा फायदा या चित्रपटाला झाला, असे मानले गेले. आपल्या स्टारडमच्या जोरावर प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचण्यात करिना यशस्वी झाली. ‘वीरे दी वेडींग’साठी करिनाने ७ कोटी रूपये घेतले होते. पण आता करिनाची फी १० कोटींच्या वर गेल्याचे कळते आहे. दुहेरी आकड्यात फी घेणाऱ्या फार कमी नट्या बॉलिवूडम्ये आहेत. पण ही संख्या दिवसांगणिक वाढते आहे. दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, कंगना राणौत आणि आता करिना कपूर हिचे नाव या यादीत आता दाखल झाले आहे.

 

 

Web Title: kareena kapoor hiked her fees after veere di wedding success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.