मारेकऱ्याच्या शोधात करीना कपूर, मर्डर, मिस्ट्री आणि थरार 'द बकिंघम मर्डर्स'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 03:54 PM2024-08-20T15:54:46+5:302024-08-20T15:55:22+5:30

The Buckingham Murders : करीना कपूरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'द बकिंघम मर्डर्स'चा टीझर अखेर भेटीला आला आहे. या सिनेमात करीना कपूर एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. यात ती एक मर्डर मिस्ट्री सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.

Kareena Kapoor in search of killer, murder, mystery and thrill in 'The Buckingham Murders' | मारेकऱ्याच्या शोधात करीना कपूर, मर्डर, मिस्ट्री आणि थरार 'द बकिंघम मर्डर्स'मध्ये

मारेकऱ्याच्या शोधात करीना कपूर, मर्डर, मिस्ट्री आणि थरार 'द बकिंघम मर्डर्स'मध्ये

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) 'द बकिंघम मर्डर्स' (The Buckingham Murders ) चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पोस्टर पाहून या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. अखेर या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या करीना वेगवेगळ्या अंदाजात दिसत आहे. 

हंसल मेहता जे वेगवेगळ्या जॉनरमधील सिनेमांसाठी ओळखले जातात. आता ते संस्पेन्स थ्रिलरच्या जगात एंगेजिंग नरेटिव्ह सोबत पाऊल टाकत आहेत. करीना कपूर नेहमीपेक्षा वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. करीनाला मर्डर मिस्ट्री सोडवताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.


'द बकिंघम मर्डर्स' १३ सप्टेंबरला येणार भेटीला
'द बकिंघम मर्डर्स' चित्रपट १३ सप्टेंबर, २०२४ला भेटीला येणार आहे. या चित्रपटात करीना कपूर खान शिवाय ऐश टंडन, रणवीर बरार आणि कीथ एलन हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. असीम अरोडा, कश्यप कपूर आणि राघव राज कक्कड लिखित महाना फिल्म्स आणि टीबीएम फिल्म्स निर्मित असून बालाजी टेलिफिल्म्स प्रस्तुत आहे. शोभा कपूर, एकता आर कपूर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटातून करीना कपूर खान निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. 
 

Web Title: Kareena Kapoor in search of killer, murder, mystery and thrill in 'The Buckingham Murders'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.