बेबोची खवय्येगिरी! पतौडी पॅलेसमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय करिना कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 12:09 PM2023-12-19T12:09:13+5:302023-12-19T12:11:47+5:30

सध्या करिना आपल्या कुटुंबासोबत पतौडी पॅलेसमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

Kareena Kapoor is enjoying her holiday at Pataudi Palace with saif ali khan | बेबोची खवय्येगिरी! पतौडी पॅलेसमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय करिना कपूर

बेबोची खवय्येगिरी! पतौडी पॅलेसमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय करिना कपूर

बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती कायमच चर्चेत असते. सध्या करिना आपल्या कुटुंबासोबत पतौडी पॅलेसमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. करिना जेव्हा-जेव्हा पॅलेसमध्ये कुटुंबासोबत सुट्टी घालवायला जाते, त्यावेळी ती काही खास फोटो शेअर करत असते. यावेळी करीनाने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 पतौडी पॅलेसमधील व्हेकेशन फोटो शेअर करताना करीना कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले,'आमच्याच बागेतील 'मक्की की रोटी सरसों दा साग'.  हे माझ्या आवडत्या गोष्टींपैकी एक आहे'. करिनाने विंटर वुमन असा हॅशटॅगही दिला आहे. या पोस्टवर सारा अली खाननेही 'एक आइडियल लंच' अशी कमेंट केली. चाहत्यांनीही करिनाच्या या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.  

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये पतौडी पॅलेस आहे. हे पॅलेस 1972 मध्ये बांधण्यात आले होते. पतौडीचे शेवटचे शासक इफ्तिखार अली खान यांच्या निधनानंतर हा राजवाडा त्यांचा मुलगा मन्सूर अली खान आणि त्याची पत्नी शर्मिला टागोर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. सध्या सैफ हा या पतौडी पॅलेसचा मालक आहे. करिनाचा वाढदिवसही याच पॅलेसमध्ये साजरा करण्यात आला होता. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, करीना लवकरच 'सिंघम ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच तिने करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली होती. 

 

Web Title: Kareena Kapoor is enjoying her holiday at Pataudi Palace with saif ali khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.