करिना कपूरचं प्रेग्नंसीवरचं पुस्तक वादाचं कारण ठरलं; होऊ शकते कायदेशीर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 02:37 PM2021-07-13T14:37:02+5:302021-07-13T14:40:35+5:30

होय, करीनाचं पुस्तक वादाच कारण ठरलं आहे. ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्ड याप्रकरणी करिनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे कळतेय.

Kareena Kapoor Khan Book All India Minority Board Opposed The Title | करिना कपूरचं प्रेग्नंसीवरचं पुस्तक वादाचं कारण ठरलं; होऊ शकते कायदेशीर कारवाई

करिना कपूरचं प्रेग्नंसीवरचं पुस्तक वादाचं कारण ठरलं; होऊ शकते कायदेशीर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देकाही महिन्यांपूर्वी करीनाने दुसऱ्या  मुलाला जन्म दिला. फॅन्स करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या झलकची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अभिनेत्री करीना कपूर खान ( Kareena Kapoor Khan ) काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली आणि यानंतर काही दिवसांतच बेबोचे गरोदरपणावर लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं. खुद्द करिनाने या पुस्तकाची माहिती सोशल मीडियावर शेर केली होती. हे पुस्तक म्हणजे माझं तिसरं मुलं असल्याचंही ती म्हणाली होती. पण आता या पुस्तकामुळं करिनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. होय, तिचं  पुस्तक वादाच कारण ठरलं आहे. ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्ड याप्रकरणी करिनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे कळतेय.
 करीनानं तिच्या या पुस्तकात तिची गर्भावस्थेतील शारिरीक व मानसिक  अनुभव मांडले आहेत.   दोन्ही वेळेला करीनाच मोठ्या प्राणावर वजन वाढलं होतं. त्यावरही तिने या पुस्तकात अनुभव मांडला आहे. 
काही महिन्यांपूर्वी करीनाने दुसऱ्या  मुलाला जन्म दिला. फॅन्स करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या झलकची आतुरतेने वाट पाहत आहेत. करिनाने तिच्या दुसऱ्या  बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला मात्र या फोटोत त्या बाळाचा चेहरा दिसत नाहिये.  

काय आहे वाद...
करिना कपूरने तिच्या दोन्ही प्रेग्नंसी काळातील अनुभवांच्या आधारावर ‘Kareena Kapoor Khan’s Pregnancy Bible’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाच्या नावावरून आता वाद निर्माण झाला आहे. ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डाने पुस्तकाच्या नावातील ‘बायबल’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे. ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डचे अध्यक्ष डायमंड युसुफ यांनी कानपूरमध्ये एका बैठकीच आयोजन केलं होतं.  या बैठकीत करीनाच्या पुस्तकाचा विरोध करण्यात आला. पुस्तकाचं नाव ‘प्रेग्नंसी बायबल’ ठेवल्याबद्दल करिनाची कडक शब्दांत निंदा करण्यात आली.
 सूत्रांच्या माहितीनुसार, मायनॉरिटी बोर्ड याप्रकरणी करीना विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे करीना विरोधात लवकरच गुन्हा दाखल होऊ शकतो.  

Web Title: Kareena Kapoor Khan Book All India Minority Board Opposed The Title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.