सैफ अली खानवर हल्ला झाल्यावर करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- "त्याच्या हाताला जखम झाली असून.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:31 IST2025-01-16T11:31:14+5:302025-01-16T11:31:59+5:30
सैफ अली खानवर सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या सर्व प्रकरणात करीना कपूरची प्रतिक्रिया समोर आलीय (saif ali khan, kareena kapoor)

सैफ अली खानवर हल्ला झाल्यावर करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- "त्याच्या हाताला जखम झाली असून.."
आज पहाटे सर्वांना धक्का देणारी बातमी समोर आली. ती म्हणजे अभिनेता सैफ अली खानवर (saif ali khan) एका चोरट्याने चाकूने हल्ला केला. यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या. सैफवर सध्या मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सैफवर चाकूने वार करण्यात आल्याने त्याच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत. अखेर या सर्व प्रकरणावर सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.
सैफवर हल्ला झाल्यावर करीना काय म्हणाली?
करीना सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये असून तिने या संपूर्ण घटनेवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. करीना म्हणाली की, "सैफच्या हाताला जखम झाली असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये सर्जरी सुरु आहे. आमचं पूर्ण कुटुंब सुरक्षित आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना आवाहन करतो की तुम्ही संयम ठेवा आणि कोणतेही अंदाज बांधू नका. पोलीस याविषयी सखोल तपास करत आहेत. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद."
सैफवर हल्ला कसा झाला?
आज गुरुवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास एक अज्ञात इसम सैफ-करीनाच्या मुंबईतील घरात चोरी करण्याच्या हेतून घुसला होता. पुढे घरातील लोक जागे झाल्यानंतर तो चोर घटनास्थळावरून पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. वांद्रे पोलिसांनी या घटनेसंबंधी FIR नोंदवला असून गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. सैफ आणि त्यांच्या घरातील मोलकरीण या घटनेत जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.