करिना कपूरच्या गुड न्यूज चित्रपटाचा लूक तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 09:00 PM2019-02-27T21:00:00+5:302019-02-27T21:00:02+5:30

करिना कपूर आणि अक्षय कुमार यांनी अजनबी, ऐतराज, टशन, बेवफा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्या दोघांची केमिस्ट्री खूप छान असून प्रेक्षकांना त्यांची जोडी खूपच आवडते. आता प्रेक्षकांना त्यांची जोडी पुन्हा एकदा गुड न्यूज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

kareena kapoor khan flaunts a baby bump on the sets of good news | करिना कपूरच्या गुड न्यूज चित्रपटाचा लूक तुम्ही पाहिला का?

करिना कपूरच्या गुड न्यूज चित्रपटाचा लूक तुम्ही पाहिला का?

googlenewsNext
ठळक मुद्देया फोटोंमध्ये करिना कपूर बेबी बम्पसह दिसत असून करिना ग्रे रंगाची पँट आणि त्यावरील त्याच रंगाच्या टी-शर्ट मध्ये खूपच छान दिसत आहे. या चित्रपटाची अक्षय आणि करिनाचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत.

करिना कपूरच्या नव्या चित्रपटाचे नाव गुड न्यूज असून या चित्रपटात ती गुड न्यूज देताना दिसत आहे. या चित्रपटातील तिचा लूक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

करिना कपूर आणि अक्षय कुमार यांनी अजनबी, ऐतराज, टशन, बेवफा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्या दोघांची केमिस्ट्री खूप छान असून प्रेक्षकांना त्यांची जोडी खूपच आवडते. आता प्रेक्षकांना त्यांची जोडी पुन्हा एकदा गुड न्यूज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. गुड न्यूज या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरू असून या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो  सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

या फोटोंमध्ये करिना कपूर बेबी बम्पसह दिसत असून करिना ग्रे रंगाची पँट आणि त्यावरील त्याच रंगाच्या टी-शर्ट मध्ये खूपच छान दिसत आहे. या चित्रपटाची अक्षय आणि करिनाचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. गुड न्यूज या चित्रपटात या दोघांसोबतच दलजीत दोसांज आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून हा चित्रपट ६ सप्टेंबर २०१९ ला प्रदर्शित होत आहे. 

गुड न्यूज या चित्रपटानंतर करिना कपूर करण जोहरच्या तख्त या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. करिनाची या चित्रपटातील भूमिका काय असणार याविषयी तिने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे. ती या चित्रपटात जहाँआरा बेगम ही व्यक्तिरेखा साकारत असून जहाँआरा ही एक मुघल काळातील राजकुमारी असून मुघल बादशहा शाह जहाँ यांची ती मोठी मुलगी होती. या चित्रपटातील तिची भूमिका आजवरच्या तिच्या सगळ्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. ही भूमिका ऐकल्यानंतर या भूमिकेच्याच मी प्रेमात पडले असे करिना सांगते. सध्या ती या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेत असून या भूमिकेसाठी ती उर्दू शिकत आहे. या चित्रपटात औरंगजेब आणि दारा शिकोह या दोन मुघल राजांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. 

Web Title: kareena kapoor khan flaunts a baby bump on the sets of good news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.