पंजाबी सुट, कपाळावर टिकली, बांधलेले केस अशा अंदाजात दिसली करिना कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 07:29 PM2021-07-02T19:29:49+5:302021-07-02T19:30:30+5:30

एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमधील झिरो फिगर असलेली एकमेव एक्ट्रेस बेबो म्हणजेच करिना कपूर ओळखली जायची.झिरो फिगरसाठी तिनं किती मेहनत घेतलेय ते सर्वांना ठाऊकच आहे.

Kareena Kapoor Khan Get clicked outside Randhir Kapoor’s new residence | पंजाबी सुट, कपाळावर टिकली, बांधलेले केस अशा अंदाजात दिसली करिना कपूर

पंजाबी सुट, कपाळावर टिकली, बांधलेले केस अशा अंदाजात दिसली करिना कपूर

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून करिना कपूर प्रचंड चर्चेत आहे. सीतेच्या भूमिकेसाठी दुप्पट मानधन मागितल्यामुळे ती चर्चेत होती. तर दुसरीकडे करिनाने ही भूमिका साकारु नये म्हणून तिच्याविरोधात सोशल मीडियावर नेटीझन्स बोलताना दिसत होती. करिना कपूर या भूमिकेसाठी योग्य निवड नसून दुस-याच अभिनेत्रीने ही भूमिका साकारावी अशी ईच्छा व्यक्त करताना दिसले. इतकेच काय तर करिना कपूरला बॅन करण्यात यावे अशीही मागणी नेटीझन्स करताना दिसले. त्या वादानंतर आता पहिल्यांदाच करिना कपूर मीडियासमोर आली. 

करीना कपूर नुकतीच मीडियाच्या कॅमे-यात कैद झाली. वडील रणधीर कपूर यांनी वांद्रे येथील आपल्या नवीन घरात पूजा ठेवली होती. यानिमित्ताने कपूर कुटुंबातील अनेक सदस्यांनी पूजा आणि गृहप्रवेश कार्यक्रमात हजेरी लावली. यादरम्यान करीना अगदी सिंम्पल आणि सोबर लूकमध्ये दिसली. तिच्या फोटोंमध्ये कपाळावर टिकली, पांढरा सलवार सूट तिने यावेळी परिधान केला होता. केसही बांधलेले त्यात वाढलेल्या वजनामुळे तिचा लूकही फार बदलल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच विनामेकअप ती स्पॉट झाली होती. या लूकमध्ये ती सुंदरच दिसत होती.मीडिया समोर तिने हसत हसत मस्त पोज दिल्या.

करीना कपूरनेफेब्रुवारीमध्ये तिच्या दुस-या बाळाला जन्म दिला होता.मुलाला जन्म दिल्यानंतर करीनाने वजनही वाढले ​​आहे. वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट, योगा आणि योग्य आहारही घेते. हळूहळू पुन्हा करिना नेहमीप्रमाणे स्लिम ट्रिम दिसू लागले यासाठी तिचे प्रयत्न जोरावर आहेत. प्रेग्नंसीदरम्यानही फिट राहता यावे यासाठी करिनाने योगा करण्यावरच भर दिला होता.


एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमधील झिरो फिगर असलेली एकमेव एक्ट्रेस बेबो म्हणजेच करिना कपूर ओळखली जायची. आपल्या डाएट साठी नेहमीच कॉंशियस असते. झिरो फिगरसाठी तिनं किती मेहनत घेतलेय ते सर्वांना ठाऊकच आहे. आजही इतकंच नव्हे तर खाण्या पिण्यामध्येही ती काटेकोरपणे शिस्त बाळगते. करिनाच्या चाहत्यांना वाटलं की नवाब सैफ अली खानची पत्नी झाल्यानंतर आता करिनाही नवाबी फुडकडे आकर्षित होईल मात्र असं झालं नाही. करिनाला साधं शुद्ध भारतीय जेवणच आवडतं.

Web Title: Kareena Kapoor Khan Get clicked outside Randhir Kapoor’s new residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.